Latur News: अखेर पिसाळलेल्या माकडांपासून गावकऱ्यांची सुटका; ६० जणांना घेतला होता चावा

अखेर पिसाळलेल्या वानरांपासून गावकऱ्यांची सुटका; ६० जणांना घेतला होता चावा
Latur News
Latur NewsSaam tv
Published On

लातूर : जिल्‍ह्यातील सोनखेड गावात काही माकडांनी उच्‍छाद मांडला होता. काही केल्‍या माकड सापडत नव्‍हते. परंतु पाच दिवसांनंतर त्या वानराला आणि अन्य पाच अश्या सहा माकडांना पकडण्यात वन विभागाला (Forest Department) यश आले आहे. त्यामुळे पाच दिवसांनंतर त्या गावकऱ्यांची त्या पिसाळलेल्या वानरापासून सुटका झाली आहे. (Tajya News)

Latur News
Wardha News: धक्‍कादायक..घरात एकट्या असलेल्‍या दृष्टीहीन मुलीचा विनयभंग

गेल्या पाच दिवसांपासून गावकरी व लातुरची (Latur) वन विभाग त्या वानराला पाकडण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवित होते. पण त्यांना काही केले तरी ते वानर सापडत नव्हते. त्यानंतर औरंगाबाद (Aurangabad) येथील वन विभागांच्या पथकाला त्या ठिकाणी पाचारण करण्यात आले. त्याला पथकांनी पिसाळलेल्या वानराला पकडून पिंजऱ्यात बंद केले आहे.

६० जणांना चावा

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील सोनखेड गावांमध्ये एका पिसाळलेल्या वानराने 60 लोकांचा चावा घेतला होता. त्यामुळे गावात भितीचे वातावरण पसरले होते. माकड पकले गेल्‍याने नागरीकांनी सुटकेचा निश्‍वास सोडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com