Latur : लातूर मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांचा आत्महत्येचा प्रयत्न, स्वतःवर गोळी झाडली

Babasaheb Manohare gunshot : लातूरमध्ये मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस तपास करत आहेत.
Latur Municipal Commissioner Babasaheb Manohare news
Latur Municipal Commissioner Babasaheb Manohare news
Published On

Latur Municipal Commissioner Babasaheb Manohare news : लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शनिवारी रात्री त्यांच्या लातूर येथील शासकीय निवासस्थानात घडली. मनोहरे यांनी स्वत:च्या रिव्हॉल्वरमधून डोक्यात गोळी झाडली, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने लातूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. तरीही, त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवले जात आहे.

या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी आयुक्तांची रिव्हॉल्वर ताब्यात घेतली असून, या घटनेच्या मागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आतापर्यंत मनोहरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला, याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. ही घटना लातूर शहरात चर्चेचा विषय बनली असून, नागरिकांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे. मनोहरे यांनी कौटुंबिक कारणामुळे की त्यांच्यावर कार्यालयीन तणावात हा निर्णय घेतला, याबाबत लातूरमध्ये चर्चा सुरू आहे.

Latur Municipal Commissioner Babasaheb Manohare news
Pune Crime : चार दिवसांपासून नवरा बेपत्ता, बायको अन् कुटुंब शोध घेऊन हैराण, पाचव्या दिवशी खाणीत मृतदेहाचे तुकडे; पुणे हादरलं

बाबासाहेब मनोहरे हे लातूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. अशा परिस्थितीत त्यांनी असा टोकाचा निर्णय का घेतला, हे अजूनही गूढच आहे. पोलिस तपासातून याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. सध्या सर्वांचे लक्ष मनोहरे यांच्या प्रकृतीकडे आणि या घटनेच्या तपासाकडे लागले आहे. ही घटना लातूरसह संपूर्ण राज्यात खळबळ माजवणारी ठरली आहे.

Latur Municipal Commissioner Babasaheb Manohare news
Nanded Crime : आधी नवऱ्यानं आयुष्य संपवलं, त्याचठिकाणी बायकोचा मृतदेह आढळला; नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com