
लातूरमध्ये सलग १० दिवस पाऊस.
पिके पाण्याखाली गेली.
शेतकऱ्यानं आयुष्य संपवलं.
राज्यातील विविध भागांमध्ये पावसानं रौद्ररूप धारण केलं आहे. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातही कोसळधार सुरू आहे. नद्या दुथडी भरून वाहत असून, शेती पाण्याखाली गेल्या आहेत. लातूरमध्ये गेल्या दहा दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे. शेतीचं झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचललं आहे. राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर माने कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.
लातूर जिल्ह्यात मागच्या दहा दिवसापासून संततधार सुरू आहे. अतिवृष्टीने हैराण झालेल्या शेतकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. अशातच जळकोट तालुक्यातल्या चेरा येथील शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचललं आहे. उत्तम माने असे अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं.
उत्तम माने यांच्याकडे केवळ एक एकर कोरडवाहू शेती आहे. तीही अतिवृष्टीमुळे गेली. माने कुटुंबाचा उदरनिर्वाह याच शेतीवर होता. शेतीवर उदरनिर्वाह भागात नसल्याने त्यांनी सालगडी म्हणून मजुरी करण्यास सुरूवात केली. तसेच यावर ते आपला संसाराचा गाडा हाकत होते. मात्र सलग झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पीक पूर्णत: पाण्यात गेले. यामुळे त्यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.
मांजरा नदी दुथडी भरून वाहतेय
लातूरच्या मांजरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. तर मांजरा धरणाचे आठ दरवाजे उघडण्यात आले आहे. मांजरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय. नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. मांजरा नदीवरील १२ उच्च पातळीचे बंधारे हे १००% टक्के क्षमतेने भरले आहेत.
भोयरा गावात जनजीवन विस्कळीत
लातूर ग्रामीणमधील भोयरा गावात जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रचंड मोठा पाऊस झाल्याने, गावातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलंय. संस्वरूपयोगी वस्तू पाण्यामुळे खराब झाले आहेत. लहान मुलं आणि नागरिक प्रशासनाच्या मदतीची अपेक्षा व्यक्त करत आहेत. नागरिकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहेत.
आमदार अमित देशमुखांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी
लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील सहा लाख हेक्टरवरील शेती पिक पावसाच्या पाण्याने बाधित झालेत. दरम्यान नुकसानग्रस्त भागात काँग्रेस नेते तथा आमदार अमित देशमुख यांनी पाहणी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.