Cyber Crime: फोन- पे ॲपवरून दोन लाखांत गंडविले; बँक खाते तपासल्यानंतर उघड झाली फसवणूक

फोन- पे ॲपवरून दोन लाखांत गंडविले; बँक खाते तपासल्यानंतर उघड झाली फसवणूक
Cyber Crime
Cyber CrimeSaam tv

लातूर : फोन पे ॲपच्या माध्यमातून एकाला अज्ञातांनी तब्बल १ लाख ९९ हजार ७५८ रुपयांना ऑनलाइन गंडा घातला. ही घटना निलंगा (Nilanga) बसस्थानक परिसरात २६ ते २८ जानेवारी दरम्यान घडली. याबाबत निलंगा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. (Tajya Batmya)

Cyber Crime
ATM Crime: एटीएममध्ये पैसे डिपॉझिटच्या बहाण्याने इसमाला गंडा

निलंगा बसस्‍थानकावर असताना देविदास शंकरराव पाटील यांच्या मोबाइलची अज्ञातांनी चोरी केली. दरम्यान, या मोबाइलचा वापर करत त्यांच्याच मोबाइलमधील फोन पे ॲपचा वापर करून फिर्यादीच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यामधून रोख १ लाख ९९ हजार ७५८ रुपये परस्पर काढून घेत गंडा घातला. याबाबत निलंगा ठाण्यात अज्ञातावर मंगळवारी गुन्हा नोंद आहे.

खाते तपासल्यानंतर बसला धक्‍का

देवीदास पाटील यांचा मोबाईल २६ ते २८ जानेवारीदरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरला. यानंतर त्यांनी याबाबत तक्रारही दाखल केली. त्याचबरोबर बँकेतील बँक खाते तपासल्यावर तब्बल १ लाख ९९ हजार ७५८ रुपयांची रक्कम परस्पर काढून घेतल्याचे समोर आले. या घटनेने फिर्यादीला घामच फुटला अन् आपल्याला अज्ञाताने गंडविल्याचे समोर आले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com