ATM Crime
ATM CrimeSaam tv

ATM Crime: एटीएममध्ये पैसे डिपॉझिटच्या बहाण्याने इसमाला गंडा

एटीएममध्ये पैसे डिपॉझिटच्या बहाण्याने इसमाला गंडा
Published on

अभिजीत देशमुख

कल्याण : एटीएममध्ये पैसे डिपॉझिट करण्याच्या बहाण्याने एका इसमाला तीन जणांनी गंडा घातल्याची घटना (Kalyan) कल्याण पूर्व काटेमानवली परिसरात घडली आहे. हे तिन्ही भामटे सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरात कैद झाले असून या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात या तीन जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. (Letest Marathi News)

ATM Crime
Dhule News: गावठी कट्टा बाळगून असलेल्या इसमाच्या आवळल्या मुसक्या

कल्याण पूर्व काटेमानवली परिसरात असलेल्या एका बँकेच्या एटीएममध्ये खेमराज नंदनवार हे पैसे डिपॉझिट करण्यासाठी गेले होते. मात्र पैसे डिपॉझिट करण्यासंदर्भात माहिती नसल्याने त्याने याचवेळी एटीएममध्ये आलेल्या एकाची मदत घेतली. एटीएममध्ये दोन साथीदार देखील त्या वेळेला होते.

रिसिप्‍ट घेण्यासाठी आल्‍यावर प्रकार लक्षात

काही वेळाने रिसिप्त घेण्यासाठी आलेल्या खेमराज यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. दरम्यान ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com