Latur Crime : शुल्लक कारणावरून वाद, मित्रानेच मित्राला संपवले, धारदार शास्त्राने गळ्यावर वार

2 Youth Killed In Latur: लातूरमध्ये एका तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या घटनेला २४ तास होत नाही तोपर्यंत दुसरी हत्येची घटना घडली.
Latur Crime: लातूर हादरले! २४ तासांत हत्येच्या दोन घटना, पोलिस आहेत कुठे?
Latur PoliceSaam Tv
Published On

संदीप भोसले, लातूर

लातूरमध्ये गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नाही. अशामध्येच लातूरमध्ये २४ तासांमध्ये दोन हत्येच्या धक्कादायक घटना घडल्या आहेत. एका तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या घटनेला २४ तास होत नाही तोपर्यंत दुसरी हत्येची घटना घडली. या हत्येच्या घटनांमुळे लातूर हादरले आहे. सध्या लातूर पोलिस या प्रकरणांचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूर शहरातल्या गंजगोलाई परिसरात एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करत आणि गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या धक्कादायक घटनेमुळे लातूरमध्ये खळबळ उडाली होती. या घटनेला २४ तास उलटत नाही तोपर्यंत हत्येची दुसरी घटना घडल्याने लातूर शहर हादरले. दरम्यान या प्रकरणी रात्री उशिरा गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latur Crime: लातूर हादरले! २४ तासांत हत्येच्या दोन घटना, पोलिस आहेत कुठे?
Nashik Crime: आपटी बॉम्ब घेऊन देण्याचे अमिष देत ७ वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग

शुल्क कारणावरून पैगंबर हाजीमलंग सय्यद याची मित्रासोबत सुरुवातीला बाचाबाची झाली. त्यानंतर मित्रानेच पैगंबरची धारदार शास्त्राने वार करत आणि गळा चिरून हत्या केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. तर मागच्या २४ तासांच्या आतच लातूरच्या मध्यवर्ती बस स्थानकासमोर एकाची भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या दोन्ही घटनांमुळे लातूर पोलिस प्रशासनाच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Latur Crime: लातूर हादरले! २४ तासांत हत्येच्या दोन घटना, पोलिस आहेत कुठे?
Mumbai Crime: मुंबई हादरली! १८ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार; वांद्रे परिसरातील संताजनक घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com