Weather Forecast: विदर्भात पुढील ५ दिवस यलो अलर्ट जारी; मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

पुणे हवामान वेधशाळेच्या अंदाजानुसार विदर्भात पुढील पाच दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Weather Forecast
Weather ForecastSaam Tv
Published On

Weather Report : आज मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. विदर्भात पुढील पाच दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र कोकणात कोरडं हवामान राहणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. पुणे हवामान वेधशाळेच्या अंदाजानुसार विदर्भात पुढील पाच दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Marathi News)

मध्य महाराष्ट्र ते तामिळनाडूपर्यंत निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र तेलंगणा ते दक्षिण तामिळनाडू इथंपर्यंत गेलं आहे. त्यामुळे हवेतील दमटपणा कमी झाला आहे. मात्र त्या पुढील चार दिवस कमाल तापमानात वाढ होईल असा इशारा हवामन खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

Weather Forecast
Pune Crime News : "ब्लू बेल्स" शाळेच्या इमारतीत घडत होत्या नको त्या घटना; संतापजनक कृत्यांमुळे शाळेची मान्यत रद्द

मुंबईत उष्णतेची लाट

राज्यात एकीकडे अवकाळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातलं असताना आता दुसरीकडे उष्णतेच्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. हवामान खात्याने (IMD) पुढील ४ दिवस मुंबईसह आसपासच्या काही जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाटेचा (Heat Wave) इशारा दिला आहे. मुंबईसह कोकणातील ४ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईत बुधवारी ३८. ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यानंतर आता पुढील चार दिवस मुंबईकरांना आणखी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कारण मुंबईसह कोकण आणि गोवा भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. २० तारखेपासून ४ दिवसांसाठी Tmax मध्ये २-४° ने घसरण होणार आहे.

Weather Forecast
Gautami Sister : कसली भारी दिसते राव...; गौतमी की तिची बहिण?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com