Marathi News Live Update : नंदुरबार जिल्ह्यात दारुने भरलेला ट्रॅक्टर उलटला

Maharashtra Chya Tajya Marathi Batmya Live (26 may 2024) : मान्सून अपडेट, रेमान चक्रीवादळ, राजकीय घडामोडी, लोकसभा निवडणूक, देश-विदेश राज्यातील प्रत्येक घडामोडी, लाईव्ह अपडेट वाचा एका क्लिकवर
Live Marathi News By Saam TV
Saam Tv Breaking News Live Updates In Marathi MaharashtraSAAM TV

नंदुरबार जिल्ह्यात दारुने भरलेला ट्रॅक्टर उलटला

नंदुरबार जिल्ह्यातील पिंगाने गावानजीक दारुणे भरलेल्या ट्रॅक्टर पलटी.

ट्रॉली खाली दबल्याने चालकाचा जागीच मृत्यू......

गोवा राज्यात निर्मिती झालेल्या बनावट दारूची वाहतूक करताना घडला अपघात.....

ट्रॉली पलटल्याने 400 पेक्षा अधिक खोके रस्त्यात विखुरले.....

अपघातात रस्त्यावर पडलेल्या दारूचे खोक्यांची नागरिकांनी केली लूट.....

राजस्थानमधील फलोडीत आज सर्वाधिक 49.8 सेल्सिअस तापमान

राजस्थानमधील फलोडी मधे आज दिवसभरातील सर्वाधिक तापमान

फलोडी मधे 49.8 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद

पुढील काही दिवस असच तापमान राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज

तर वाढत्या तापमानामुळ गुरुग्राम मधील आठवी पर्यंतच्या शाळांना 31 मे पर्यंत सुट्टी जाहीर

हिंगोली विधानसभेचे माजी आमदार दगडू गलांडे यांचं निधन

हिंगोली विधानसभेचे माजी आमदार दगडू गलांडे यांचं वृद्धापकाळाने निधन

उद्या मुळगावी बाबुळगाव येथे अंत्यसंस्कार होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला रेमल चक्रीवादळाचा आढावा

रेमल चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खरदारीचा उपाय म्हणून करण्यात आलेल्या तयारीचा घेतला पंतप्रधान यांनी आढावा

पंतप्रधान यांनी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेत माहिती घेतली

या वादळाच्या पार्श्वभूमीवर NDRF च्या 12 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत

बंगालच्या उपसागरात तयार झालेले रेमल चक्रीवादळ पुढच्या 6 तासांत वादळात रूपांतरित होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय

विवेक विहार बेबी केअर सेंटर मधील आग दुर्घटना प्रकरण

विवेक विहार बेबी केअर सेंटर मधील आग दुर्घटना प्रकरण

बेबी केअर सेंटरचे मालक नवीन कीची आणि रात्री ड्युटीवर असलेले डॉ आकाश यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक

काल रात्री लागलेल्या आगीत 6 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता

घटनेनंतर मालक आणि डॉक्टर दोघेही फरार झाले होते

पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांचा शोध सुरू केला होता

अकोल्यात चौथ्या दिवशीही पारा 45 अंशावर; वादळामुळे अनेक घरांची पडझड

अकोल्यात सलग चौथ्या दिवशीही 45 अंशावर तपमानाचा पारा कायम होता. मात्र अकोल्यात सायंकाळी पाच वाजेनंतर वातावरणात बदल पाहायला मिळाला. अकोला जिल्ह्यात अनेक भागात तुफान वारा सुटलाय. या जोराच्या वाऱ्यामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे तर काही घरांमध्ये पत्रे उडून गेलेत. इतकंच नव्हे तर अकोट आणि तेल्हारा तालुक्यातल्या केळी पिकांना मोठा फटका बसलाय.

लातूरमध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू, बाभळीच झाडपडल्यामुळे लातूर निलंगा महामार्गावरील वाहतूक ठप्प

लातूर निलंगा महामार्गावर बाभळीचे झाड पडून गेल्या 1तासापासून वाहतूक कोळंबी आहे, वाहनांच्या रस्त्यावर रांगा लागले आहेत., अचानक झालेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातल्या अनेक भागात नुकसान झाले आहे. दरम्यान लातूरच्या चाकूर तालुक्यातील माहलंग्रा शिवारात शेतात काम करणाऱ्या दोन व्यक्तींवर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकांच्या उभ्या वाहनांवर झाड पडून नुकसान झाल आहे. घरावरील पत्रे देखील वाऱ्यामुळे उडून गेले आहेत, दरम्यान जिल्ह्यातल्या काही भागातला वीजपुरवठा देखील विद्युत तारा पडल्याने खंडित झाला आहे...

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ ही धरणांमधील पाणी साठ्यात घट

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणांत मिळून सध्या १ लाख ५४ हजार ४७१ दशलक्ष लिटर म्हणजेच १०.६७ टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी २२ मे २०२३ रोजी १६.४३ टक्के पाणीसाठा होता, तर त्याआधीच्या वर्षी पाणीसाठा २१ टक्के होता.

वर्ष पाणीसाठा टक्केवारी

१) २२ मे २०२४ १ लाख ५४ हजार ४४७ दशलक्ष लिटर १०.६७ टक्के

२) २२ मे २०२३ २ लाख ३७ हजार ७२९ दशलक्ष लिटर १६.४३ टक्के

३) २२ मे २०२२ ३ लाख ३ हजार ९५३ दशलक्ष लिटार २१ टक्के

बुलढाणा जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा, अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली

बुलढाणा जिल्ह्यातील विविध भागात पुन्हा मुसळधार.

शेगाव शहरात विजांच्या कडकडाटासह तुफान वादळी वारा.

मोठमोठी झाडे उलमडून पडली जमिनीवर.

अनेक ठिकाणी झाडे विद्युत तारांवर पडल्याने तारा तुटल्या. विद्युत पुरवठा खंडित.

उन्हाळी पिकांचही मोठं नुकसान झाल्याचे समजते.

यवतमाळ जिल्ह्याला चक्रीवादळाचा तडाखा; ३ जण गंभीर जखमी

एकाचा टिनपत्रामुळे कापला हात,तर इतर दोघे गंभीर जखमी

यवतमाळच्या आर्णी व महागांव तालुक्यात अचनाक झालेल्या चक्रीवादळामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान

आर्णी,महागांव तालुक्यातील अनेक गावांना चक्रीवादळाचा जोरदार फटका

आर्णी तालुक्यातील पाभळ तर महागांव तालुक्यातील तिवरंग,चिखली मलकापूर या गावांना चक्रीवादळाचा फटका

जळगावच्या ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूमचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे बंद

जळगावच्या ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूमचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले चार मिनिटांसाठी बंद .

आज सकाळी 9 वाजेपासून ते 9.4 मिनिटापर्यंत ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रूमचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले झाले होते बंद .

जळगाव लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांनी फोन वरून कळवली माहिती..

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला दुजोरा..

जळगावच्या जामनेरमध्ये अवकाळी पावसामुळे फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

जामनेर तालुक्यातील कापूस वाडी देऊळगाव फत्तेपूर अशा वेगवेगळ्या गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान.

अवकाळी पावसामुळे केळीच्या बागा झाल्या जमीन दोस्त... हाता तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हतबल.

राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी.

मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन.

 रोहित आरआर पाटील यांचा तासगाव पोलीस ठाण्यात ठिय्या

रोहित आरआर पाटील यांचा तासगाव पोलीस ठाण्यात ठिय्या.

पाण्यासाठी बिरणवाडी येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको केल्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांना घेतलाय ताब्यात

पोलिसांच्याकडून शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या कारवाईला रोहित पाटलांचा विरोध.

शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होणार असतील तर माझ्यावर देखील गुन्हा दाखल करावा ही भूमिका घेऊन रोहित पाटील पोलीस ठाण्यामध्येच ठाण मांडून.

नागपूर पोलिसांकडून शहरात नशामुक्ती अभियान

पोलीस आयुक्तालय नागपूर शहरच्या वतीने एकत्र येऊया नशामुक्त नागपूर घडवूया" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.. हे अभियान आता नागपूर पोलीस शहरात राबविणार आहेत. नशा करू नका, याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल यांच्या संकल्पनेतून नशामुक्त नागपुर असा उपक्रम राबवला जात आहे.

रेती वाहतूक करणाऱ्या टिपरच्या धडकेत दोन युवक ठार,एक गंभीर जखमी

रेतीची वाहतूक करणाऱ्या टिपरने धडक दिल्याने दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.नांदेडच्या बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे ही घटना घडली.सगरोळी येथील नवीन पवार,मोईन शेख हे युवक मोटरसायकलने सगरोळी कडून गावातील बस्थानकाकडे जात होते.रेती घाटातून रेती वाहतूक करणाऱ्या भरधाव टिपरने या मोटारसायकला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात नवीन पवार आणि मोईन शेख हे युवक जागीच ठार झाले. तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे.

कोल्हापुरात तरुणांचा राडा; चार चाकी वाहनांची तोडफोड

कोल्हापुरातील राजेंद्रनगर परिसरात मध्यरात्री मद्यधुंद तरुणांनी राडा करत अनेक चार चाकी वाहनांच्या काचा फोडल्या. या तरुणांनी हातात तलवारी घेऊन दहशत माजवली.

सायन रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी राजेश डेरे यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत

 पुणे शहरातील अपघाताची घटना ताजी असतानाच मुंबईत देखील एका कारने वृद्ध महिलेला चिरडलं आहे. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून याप्रकरणी पोलिसांनी कारचालक डॉक्टरला अटक केल्यानंतर त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने डेरे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केलीय.

Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या ५ किलोमीटरपर्यंत रांगा

रायगड : मुंबई गोवा महामार्गावर माणगावमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. कोकणात जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या पाच ते सहा किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्या आहेत. रविवार आणि मे महिन्यातील शेवटचा आठवडा असल्याने कोकणात आणि विषेश करून समुद्र किनारी जाणाऱ्या पर्यटकांची रिघ वाढली आहे. माणगावमध्ये मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरी करणामुळे पर्यटकांचे मेगा हाल होत आहे. गेली 14 वर्षे मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव ( बाह्य वळण रस्त्याचे ) बाय पास काम रखडले आहे.

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंकडून मुंबईतील नालेसफाईच्या कामाची पाहणी

यंदाच्या पावसाळ्यात मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून महापालिकेने नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली आहे.

या कामांचा आढावा स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेत आहेत. मुंबईतील अनेक भागात जाऊन ते कामाची पाहणी करीत आहे.

नालेसफाईसाठी नागरिकांनीही सहकार्य करावं, नदी नाल्यांमध्ये कचरा फेकू नये, असं आवाहन त्यांनी मुंबईकरांना केलं आहे.

Marathwada Water Crisis : मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा; ८ जिल्ह्यात केवळ ११.७० टक्के पाणीसाठा शिल्लक 

संभाजीनगर : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात केवळ 11.70% पाणीसाठा शिल्लक; चिंता वाढली. पावसाळा लांबणीवर पडला तर पिण्याच्या पाण्याचं मोठं संकट मराठवाड्यावर ओढवण्याची चिन्हे आहेत.

सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, सीना कोळेगाव, निम्नतीरणा हे प्रकल्प कोरडे पडलेत. सध्या मृत साठ्यातून पाणी उपसा सुरू आहे. त्यातूनच त्या परिसरातील गावाची तहान भागवली जात आहे.

जायकवाडी धरणात 5 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. निम्न दुधना प्रकल्पात 4 टक्के, येलदरीमध्ये 29 टक्के, उर्ध्व पेनगंगामध्ये 34%, निम्न मनारमध्ये 24%, विष्णुपुरीमध्ये 21 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

Sangali News : सांगलीत पाणीप्रश्न पेटला, पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची

सांगलीत पाणीप्रश्न पेटला असून तासगाव तालुक्यात पुनदी योजनेच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलं आहे. पाण्यावरून राजकारण चालू असल्याचाही आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

बिरणवाडी फाट्यावर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, दोन तासांच्या चक्काजाम आंदोलनानंतर पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी पोलिसांनी १० ते १२ शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

Beed News : मांजरा धरणातील जिवंत पाणीसाठा संपला; तीन जिल्ह्यांवर पाणीटंचाईचं संकट

बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील अनेक भागांना पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातील जिवंत पाणीसाठा आता संपला आहे. बीडच्या केज तालुक्यात असणाऱ्या धनेगाव येथील या मांजरा धरणात, आता थेंबभरही जिवंत पाणीसाठा शिल्लक राहिला नाही. यामुळे या तीन जिल्ह्यातील अनेक भागांवर भीषण पाणीटंचाई ओढावण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जनावरांच्या चारा अन पाण्याचा देखील प्रश्न आता गंभीर बनला आहे. यामुळं प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे..

Gondia News : गोंदियाच्या पालेवाडा येथे भीषण पाणीटंचाई; जल जीवन मिशन योजना ठरली फोल

तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील पालेवाडा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महीलांची शेत शिवारातील भटकंती शासनाच्या विविध पाणी योजनांचा समाचार घेण्यासारखी आहे.

गोंदिया जिल्हा परिषदेच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर जलजीवन मिशन मोहीम राबविण्यात येत आहे. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पालेवाडा या गावात घरोघरी नळ कनेक्शन लावण्यात आले. मात्र जिल्हा परिषदेने ज्या ठिकाणी पाण्याच्या मुख्य स्त्रोतासाठी विहीर खोदली ती जागा चुकीची निवडल्याने जानेवारी महिन्यातच तेथील पाणी आटले.

यासह गावातील बोरवेल देखील कोरड्या पडल्याने आता येथील महिलांना पाण्यासाठी दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. शेत-शिवारातून महिलांना पाणी आणावे लागत आहे. तर चुकीच्या नियोजनामुळे 95 लक्ष खर्च करून देखील गावकऱ्यांना पाणी मिळत नसेल तर शासनाच्या योजना खरचं नागरिकांसाठी राबविण्यात येतात का ? असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

तर पालेवाडा गावापासून अवघ्या 5 किमी अंतरावर असलेल्या कलपाथरी मध्यम प्रकल्पावर पाण्याची योजना कार्यान्वीत करून पालेवाडा वासियांची तहान भागवावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

 Delhi Fire News : दिल्लीतील कृष्णनगर परिसरात भीषण आग, तिघांचा मृत्यू, १० जखमी

दिल्लीतील कृष्णनगर परिसरात शनिवार रात्री आगीची घटना घडली. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून १० जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये आई आणि मुलांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आगीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

Higoli News : हिंगोली जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईचं; तलावं आटली, विहीरी कोरड्याठाक

हिंगोली जिल्ह्यांमध्ये दुष्काळाने पाणीटंचाईची भीषणता वाढत चालली आहे, बोरवेल तलाव व धरणातील पाणीसाठा घटत असताना आता हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यामधील तीनशे पेक्षा अधिक विहिरीतील पाणीसाठा पूर्ण पणे आटला आहे,

हिंगोलीच्या ईसापुर शिवारामध्ये तर 52 फुटांपेक्षा अधिक खोल असलेल्या विहिरी देखील कोरड्या ठाक पडल्याने शेत शेतशीवारातील जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करायचं कुठून असा गंभीर प्रश्न या भागातील शेतकऱ्यांनी प्रशासनाला केला आहे दरम्यान शहरांप्रमाणे गावांना व शेतशिवारातील जनावरांना देखील टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी आता शेतकरी करू लागले आहेत

कळंबोली, नवीन पनवेल, करंजाडे आणि काळुंद्रे विभागात पाणी पुरवठा बंद

मान्सूनपूर्व कामे आणि भोकरपाडा जल शुद्धीकरण केंद्रात आपत्कालीन काम काढल्याने आज पाणी पुरवठा बंद आहे. कळंबोली, नवीन पनवेल, करंजाडे आणि काळुंद्रे विभागात पाणी पुरवठा बंद. उद्या सकाळी 9 वाजे पर्यंत पाणी पुरवठा होणार नाही. तर उद्यापासून पुढील 2 दिवस पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे. सिडकोच्या पाणी पुरवठा विभागाकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

कुंडलिका नदीत पर्यटकाचा बुडून मृत्यू

Raigad News: माणगाव तालुक्यातील भिरा कॉलनी परिसरात कुंडलिका नदी पात्रात पोहायला गेलेल्या दोन मित्रांपैकी एकाचा बुडून मुत्यु झाला आहे. संकेत परळकर वय वर्ष 21 मुळ राहणार नांदेड असे मृत तरुणाचे नाव आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली.

इमारतीमधील फ्लॅटला भीषण आग; कल्याणमधील घटना

कल्याण पश्चिमेच्या गोदरेज हिल परिसरात असलेल्या कैसोरीला या इमारतीमधील फ्लॅटला सकाळी ७.३० च्या सुमारास आग लागली होती.आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. याआगीत सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही मात्र घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे

Mumbai-Ahmedabad Expressway : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या दीड किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्या आहेत. सध्या घोडबंदरमध्ये गायमुख घाटाजवळ रस्ते दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे या महामार्गावरून अवजड वाहनांंना बंदी घालण्यात आली आहे. तरी देखील काही वाहनचालक महामार्गावरून वाहने नेत असल्यामुळे मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सध्या पोलिसांकडून वाहतूक कोंडीचे प्रयत्न सुरू आहेत.

Dharashiv News : येरमाळा परिसरात वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस; व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान

धाराशिवच्या येरमाळा परिसरात शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावासमुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुकाने जमीनदोस्त झाल्याने व्यापाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवलं आहे. आमदार कैलास पाटील यांनी नुकसानीची पाहणी करत प्रशासनाला मदतीच्या सूचना दिल्या आहेत.

Pandharpur News : विठ्ठल मंदिराला अतिक्रमणाचा विळखा; मंदिर परिसरात होतेय गर्दी

लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या भोवती मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले आहे. अतिक्रमणामुळे विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

संत नामदेव पायरी ते व्ही आयपी गेट दरम्यान मोठ्या प्रमाणावर मंदिराच्या भोवती अतिक्रमण वाढले आहे. छोटे-मोठे व्यापारी हातगाडी वाले खेळणी विकणारे याशिवाय रस्त्याच्या मधोमध उभे राहून विक्री लोकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मंदिराची बाहेरील सुरक्षा ही रामभरोसे झालीआहे.

विठ्ठल मंदिर हे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते मंदिरासाठी स्वतंत्र पोलीस यंत्रणेची व्यवस्था केली आहे. तरीही मंदिराच्या बाजूने अतिक्रमण वाढत आहे या वाढत्या अतिक्रमणामुळे मंदिराच्या सुरक्षेतेला बाधा पोचली आहे. याशिवाय वारकऱ्यांना देखील याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Parbhani News : धरण उशाला, कोरड घशाला; येलदरी धरणात पाणी असूनही नागरिकांची वणवण

अर्ध्या मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जिल्ह्यातील पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणात सद्य:स्थितीत केवळ 28 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. तर जिल्हातील दुसरे मोठे धरण दूधना प्रकल्पात केवळ 10 टक्के पाणी साठा शिल्लक आहे. येलदरी धरणातून परभणी, शहरासह जिंतूरला पाणीपुरवठा होतो. पण धरणात कमी पाणी असल्याने व सतत च्या तांत्रिक बिघाडीमुळे जिंतूर शहराला 15 ते 20 दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे.

प्रशासनाचे ढिसाळ नियोजनामुळे धरणात पाणी असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तालुक्यातील ब्राम्हणगाव, चारठाणा, कोसडी, बोरी झरी येथे बोर, विहरी आटल्याने ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे.

टँकरने कोरड्या विहरीत पाणी टाकून ग्रामस्थांना पाणी घावे लागत आहे .सध्यस्थितीत जिंतूर शहराला तर तालुक्यात सत्तरा टँकरने ने पाणी देण्यात येते, काही वाढ्या वस्त्यामंधे टँकरची मागणी असून भविष्य काळात पाऊस पडला नाही तर भीषण परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे.

 Beed News : बीड शहरातील नागरिकांना दुष्काळाचे चटके; पिण्याच्या पाण्यासाठी अनेकांची वणवण

बीड जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा आता गावखेड्यासह शहरातील नागरिकांना देखील बसू लागल्या आहेत. बीड शहराला 15 दिवसाला पाणी येत असल्याने आता शहरवासीयांची पिण्याच्या पाण्याची मदार ही एकप्रकारे पाण्याच्या एटीएमवर असल्याचं पाहायला मिळालाय. बीड शहरात पाण्याच्या एटीएमवर नागरिकांनी आपला जार, बॉटल भरण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान यावेळी अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनीच या पाण्याच्या एटीएमवर आपला नंबर लावला असून 42 डिग्री तापमानामध्ये रांगेत पाणी भरण्याची वेळ आता बीडकरांवर आली आहे..

Dharashiv News : धारशिव जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा; हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची वणवण

धाराशिव जिल्ह्याला तीव्र पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. दिवसागणिक टँकरच्या संख्येत वाढ होत चालली आहे. सध्या जिल्ह्यांमधील 91 गावांसाठी 135 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे तर 767 विहीर व बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

धाराशिव शहराला नऊ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतोय त्यामुळे या शहरातील खाज्जा नगर,आगड गल्ली,फकीरा नगर भागातील नागरीकांना पाण्यासाठी वनवण करण्याची वेळ आली आहे तर ग्रामीण भागात देखील हंडाभर पाण्यासाठी नागरीकांना धावपळ करावी लागत आहे.

जिल्ह्यात पाणीपुरवठा टँकरची स्थिती

धाराशिव - 25

तुळजापूर -04

उमरगा-10

लोहारा-07

कळंब - 24

भुम 41

वाशी - 10

परंडा - 14

Marathi News Live Update : रेमान चक्रीवादळ धडकणार, महाराष्ट्रावर काय होणार परिणाम?

बंगालच्या उपसागरात तयार झालेले रेमल चक्रीवादळ आज पश्चिम बंगालमधील सागर बेट आणि बांगलादेशातील खेपुपारा किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. परिणामी काही भागांत वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

रविवारी (२६ मे) पहाटे बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता आहे. यादरम्यान वाऱ्यांचा ताशी वेग १०० ते १२० किमी प्रतितास असू शकतो. महाराष्ट्रावर या चक्रीवादळाचा कुठलाही परिणाम होणार नसल्याचं हवामान खात्याने सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com