Mumbai News: मुंबईत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. कसलीही भीती न बाळगता नागरिक दिवसाढवळ्या एकमेकांवर हल्ला करत आहेत. मुलुंडमधून हत्येची एक मोठी घटना समोर आली आहे. या घटनेत एका ३३ वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. राग अनावर झाल्याने तरुणाने या व्यक्तीची हत्या केली. (Latest Mumbai News)
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मुकेश शेट्टी असं मृत व्यक्तीचं नाव आहे. या व्यक्तीने एक महिलेशी भांडण करत शिवीगाळ केली होती. महिलेच्या २१ वर्षीय मुलाला या घटनेनं राग अनावर झाला. त्याचे आणि शेट्टी यांचे जोरदार भांडण सुरु झाले. भांडण वाढून दोघांमध्ये हाणामारीला सुरुवात झाली. अशात रागाच्या भरात आरोपीने शेट्टींची हत्या केली आहे.
मुलुंडच्या बीएमसी कॉलनीजवळ आशिर्वाद इमारत परिसरात ही घटना रविवारी रात्री घडली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी मुलुंड पोलिस ठाण्यात कलम ३०२ भा द वी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
आधी पत्नीला संपवलं, नंतर स्वत:ही घेतला गळफास
हत्येची आणखी एक घटना नागपूर शहरातून समोर आली आहे. नागपूरमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पती पत्नीमध्ये वाद झाला. क्षणार्धात वाद इतका विकोपाला गेला, की पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी हातोड्याने वार केला. या घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला. पत्नीची हत्या केल्यानंतर पतीनेही स्वत: गळफास लावत आपली जीवनयात्रा संपवली. थरकाप उडवणारी ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास सदर पोलीस ठाणे परिसरात घडली.
सोनिया मंडाले असं हत्या झालेल्या पत्नीचे नाव असून राजेश मंडाले, असं आरोपी पतीचं नाव असून त्यानेही आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मॉइल वसाहतीत राहणाऱ्या राजेश आणि सोनिया यांचा प्रेमविवाह झाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.