Today's Marathi News Live: सातारची जागा शरद पवार गटाकडे, ते देतील तो उमेदवार; पृथ्वीराज चव्हाण

Maharashtra Live News and Update in Marathi (5 April 2024): राज्यातील आणि देशातील महत्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा.
Marathi News Live By Saam Tv
Aajchya Marathi Batmya Live - 5 April 2024 | Latest Updates on IPL, Amit Shah, Sanjay Nirupam, Lok Sabha Election, Amit Shah and overall MaharashtraSaam Tv
Published On

सातारची जागा शरद पवार गटाकडे, ते देतील तो उमेदवार; पृथ्वीराज चव्हाण

सांगलीच्या जागेचा प्रश्न आमच्या दृष्टीने प्रलंबीत आहेत. .काही नेते दिल्लीला वरिष्ठना भेटायला गेलेले. ..वरिष्ठ नेते कोणता निर्णय देतील तो मान्य केला जाईल. भिवंडी संदर्भात जे काही प्रश्न आहेत ते आम्ही वरिष्ठांना कळवले आहे ते जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल साताराची जागा शरद पवारांकडे आहे तो देतील तो उमेदवार असेल, तुतारीवर लढण्याच्या प्रश्नावर नो कॉमेंट

मोहिते पाटील - निंबाळकरांचं ठरलं, माढातून तुतारी चिन्हावर लढणार

माढा लोकसभा तुतारी चिन्हावर लढणार

उमेदवार मोहिते पाटील यांच्या घरातील असणार की रामराजे निंबाळकर यांच्या घरातील असणार यावर चर्चा सुरू

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून या दोन्ही घराण्यांना आपापसात चर्चा करून उमेदवार ठरवण्याचा सल्ला⁠

मोहिते पाटील यांच्या घरातून धैर्यशील मोहिते पाटील तर रामराजे निंबाळकर यांच्या घरातून संजीव राजे निंबाळकर माढा लोकसभेसाठी इच्छुक

⁠⁠सहकारी संस्था आणि त्यावरील संभाव्य कारवाई टाळण्यासाठी मोहिते पाटील यांच्या ऐवजी संजीव राजे निंबाळकर माढ्यामधून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता

Sanjay Nirupam: काँग्रेसमधून बाहेर पडताच संजय निरुपम घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले संजय निरुपम घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

सोमवारी घेणार मुख्यमंत्र्याची भेट

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राजकीय भूमिका जाहीर करण्याची शक्यता

बाळासाहेबांच्या विचारांशी प्रेरित होऊन आमच्या सोबत येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत :शंभूराज देसाई

Amit Shah Vidarbha Visit: अमित शहा यांचा उद्याचा विदर्भ दौरा पुढे ढकलला

अमित शहा यांचा उद्याचा दौरा पुढे ढकललला

उद्या अमित शहा येणार होते विदर्भ दौऱ्यावर

कारण अस्पष्ट

आता 12 किंवा 13 तारखेला येण्याची शक्यता.

अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांचा ठाकरे गटात प्रवेश

अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला असल्याची माहिती सचिन अहिरे यांनी दिली.

सचिन साठे यांना प्रचार समितीत घेण्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे

जागा मागण्याचा कार्यकर्त्यांना अधिकार आहे परंतु आता वेगळं काही होणार नाही

वरिष्ठ नेते आहेत ते यावर बोलतील चर्चा करतील

आम्ही विद्यमान जागा सोडलेल्या आहेत

रामटेकची जागा असेल, अमरावती असेल ते आम्ही त्यांना देऊ केली

न्यायालयाकडून निर्णय आला असं अभिप्रेत आहे

मी बोलणं त्यावर उचित ठरणार नाही

भाजपच्या वर्धापनदिनी पुण्यात राबविण्यात येणार "घर चलो अभियान"

मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी भाजप पुणे शहरात ३ लाख घरांमध्ये एक विशेष पत्रक वाटणार. उद्या ६ एप्रिल रोजी भाजपचा वर्धापनदिन असून या दिवशी मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराचे पत्रक प्रत्येक घरात वाटणार आहे.

Anil Desai News: ऐन लोकसभा निवडणुकीत अनिल देसाईंना धक्का, ठाकरे गटाला चेंबूरमध्ये खिंडार

ऐन लोकसभा निवडणुकीत अनिल देसाईंना धक्का

शिवसेना उबाठा गटाला चेंबूरमध्ये भाजपकडून खिंडार

शेकडो गट प्रमुख, उप शाखाप्रमुख, उप विभागप्रमुख यांचा सेनेला रामराम

मंत्री रविंद्र चव्हाण व भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

उत्तर मुंबई लोकसभेचे उमेदवार पियुष गोयल यांचा प्रचार सुरू

उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून महायुतीकडून भाजपाचे पियुष गोयल यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचाराला सुरुवात करण्यात आली. पियुष गोयल यांनी आज दहिसर येथील वैशाली नगर क्रिसेन्ट सोसायटी येथील नागरिकांशी संवाद साधला यावेळेस त्यांनी मला मतदान करून नरेंद्र मोदी यांना आशीर्वाद द्यावा असे आवाहन केलं.

पुण्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटला

पुण्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटला

पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याच्या कारणावरून वंचितच्या कार्यकर्त्याने पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयाची दरवाजा काच फोडली

पुण्यातील लष्कर पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंताचे कार्यालयातील दरवाजा फोडला

पुण्यात हडपसर रामटेकडी येथील वैदुवाडी भागात पाणीपुरवठा होत नसल्यामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांनी पाणीपुरवठ्याचे कार्यालय फोडले

पाणी सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

कोरेगाव भीमा प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल

पुण्यात झालेल्या एल्गार परिषद प्रकरणात अटक झालेल्या ६ मानवी हक्क कार्यकर्त्यांमध्ये सेन यांचा समावेश होता. अटकेत असलेल्या शोमा सेन यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर झालाय. NIA ने यापूर्वी त्यांच्या जामिनाला विरोध केला होता, मात्र आता त्यांना न्यायालयीन कोठडीची गरज नसल्याचं NIA ने म्हटलं.

यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघाचे वंचितचे उमेदवार यांचा उमेदवारी अर्ज रद्द

यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघाचे वंचितचे उमेदवार यांचा उमेदवारी अर्ज रद्द

अर्जात त्रुटी असल्याने उमेदवरी अर्ज करण्यात आला रद्द

अभिजीत राठोड असे वंचित बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराचे नाव

यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघात वंचितला मोठा धक्का

अण्णा भाऊ साठे क्रांती सेनेचा शिवसेना ठाकरे गटाला पाठिंबा

अण्णा भाऊ साठे क्रांती सेनेचा शिवसेना ठाकरे गटाला पाठिंबा

अण्णा भाऊ साठे यांचे नातू आणि क्रांती सेनेचे अध्यक्ष सचिन साठे हे आदित्य ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर

सांगली जिल्हा तसेच राज्याच्या विविध भागात या संघटनेचे काम चालतं

डॉन अरुण गवळीची शिक्षेतून सूट देण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केली मान्य

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याची शिक्षेतून सूट देण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मान्य केली आहे. १० जानेवारी २००६ रोजीच्या शासन निर्णयामध्ये वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या, शारीरिकदृष्ट्या अशक्त झालेल्या आणि कारावासाची निम्मी शिक्षा पूर्ण केलेल्या कैद्यांना उर्वरित शिक्षेत सूट देऊन कारागृहातून मुक्त करण्याची तरतूद आहे. याचा आधार घेत गवळीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात गृह विभाग आणि इतर प्रतिवाद्यांना हरकती घेण्यासाठी चार आठवड्यांचा अवधी दिला आहे.

संजय राऊत यांच्या सांगली दौऱ्याला काँग्रेस नेत्यांची पाठ

संजय राऊत यांच्या सांगली दौऱ्याला काँग्रेस नेत्यांची पाठ

सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते दौऱ्याला गैरहजर राहणार

विशाल पाटील हे मुंबई तर, विश्वजीत कदम पुण्यात आणि सांगली जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष विक्रम सावंत जत मतदारसंघात

सांगली लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसकडून दावा करण्यात आला आहे

या लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढत घेण्यात यावी असा प्रस्ताव राज्यातील काँग्रेस नेत्यांनी दिला होता

त्यावर अजून दिल्लीतील काँग्रेस नेत्यांकडून उत्तर आलं नाही

काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध

काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध

न्यायपत्र असं काँग्रेसच्या जाहीरनाम्याचं नाव

जाहीरनामा समितीचे अध्यक्ष पी चिदंबरम, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, माणिकराव ठाकरे उपस्थित

Marathi News Live By Saam Tv
Congress Manifesto : आरक्षण, शेतकरी, विद्यार्थाी... काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे

भिवंडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा शरद पवार यांच्या भेटीला

भिवंडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा शरद पवार यांच्या भेटीला

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने काल म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर केली होती

उमेदवारी जाहीर होताच आज म्हात्रे शरद पवार यांच्या भेटीला

भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात म्हात्रे आणि शरद पवार यांच्यात बैठक

बैठकीला रोहित पवारही उपस्थित

महादेव बुक ऑनलाईन बॅटिंग ॲप प्रकरणी आरोपपत्र दाखल, एसआयटीची कारवाई

१५००० कोटी रुपयांच्या महादेव बुक ऑनलाईन बॅटिंग ॲप प्रकरणी आरोपपत्र दाखल

सायबर पोलिसांच्या विशेष कृती दलाने (एसआयटी) दाखल केल आरोपपत्र

अटक करण्यात आलेल्या आरोपी दीक्षित कोठारी विरोधात आरोपपत्र दाखल

दीक्षित कोठारी लोटस बुक ०८ आणि महावीर ॲप ऑपरेटर

आरोपपत्रात अभिनेता साहिल खान सह अन्य 30 आरोपी पाहिजे आरोपी आले दाखवण्यात

डोमेन खरेदी करण्यासाठी कोठारीचा ईमेल एड्रेस वापरला गेल्याचा तसेच तो वीस लाख रुपये मेंटेनन्स स्वरूपात गेल्या दोन वर्षापासून देत असल्याचा एसआयटीचा आरोप

रिझर्व्ह बँकेचा कर्जदारांना मोठा दिलासा, रेपो रेटमध्ये कुठलाही बदल नाही

रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण जाहीर

रेपो रेटमध्ये कुठलाही बदल नाही

रिझर्व्ह बँकेचा कर्जदारांना मोठा दिलासा

लातूर शहर महापालिकेच्या अंतर्गत देण्यात येणारी परिवहन सेवा मागच्या आठ दिवसापासून बंद

लातूर शहर महापालिकेच्या अंतर्गत देण्यात येणारी परिवहन सेवा मागच्या आठ दिवसापासून बंद करण्यात आली आहे.

परिवहन सेवा देणाऱ्या एजन्सीला मागील एक वर्षापासूनचे थकीत बिल मिळाले नसल्याने एजन्सीने हा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे प्रवास करणाऱ्या महिला आणि विद्यार्थी यांची मोठी गैरसोय होते आहे.

दिल्ली सरकार आणि LG यांच्यामधील तणाव वाढला

दिल्ली सरकार आणि LG यांच्यामधील तणाव वाढला

दिल्लीचे उपराज्यपाल यांचं केंद्रीय गृह सचिव यांना पत्र

दिल्ली सरकार कोर्टात चुकीची माहिती देत आहे

उपराज्यपाल यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जातोय

सरकारकडून अधिकाऱ्यांचा वेळ वाया घालवला जात आहे

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सभांचा धडाका

रत्नागिरी - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सभांचा धडाका

उद्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर आणि जयगड इथं जाहीर सभा

महायुतीचा उमेदवार कोण याबाबत अद्यापही उत्सुकता

नारायण राणे यांच्या नावाची जोरदार चर्चा; किरण सामंत यांचे नाव देखील चर्चेत पण, अद्याप अधिकृत घोषणा नाही

लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात चार दुकाने जळून खाक

लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या पत्र्याच्या शेडमधील जवळपास चार दुकाने जळून खाक

दुकानाला शॉर्टसर्किटच्या कारणामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती

अग्निशामक दलाच्या जवानांनी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात

आगीमध्ये संपूर्ण दुकाने जळून खाक, कुठलीही जीवितहानी झाली

लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती 

सासवड मतदान यंत्रे चोरी प्रकरण, अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द करत पुन्हा त्याच जागेवर नियुक्तीचे मॅटचे आदेश

सासवड मतदान यंत्रे चोरी प्रकरण

अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द करत पुन्हा त्याच जागेवर नियुक्तीचे आदेश मॅटने राज्य सरकारला दिलेत

राज्य सरकारने पुरंदरच्या प्रांताधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम रजपूत अणि उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) तानाजी बरडे यांना निलंबित केले होते

पुरंदर तालुक्यातील सासवड येथील तहसीलदार कार्यालयातून मतदान यंत्र (कंट्रोल युनिट) चोरीला गेल्याची घटना ५ फेब्रुवारी उघडकीस आली होती

निवडणुकीच्या महत्त्वाच्या कामात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका या अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला होता

या आदेशाविरोधात या अधिकाऱ्यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com