
विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला मोठं यश मिळालं. याच पार्श्वभूमीवर सरकारनं लाडक्या बहिणींना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता कधी होणार? असा प्रश्न महिलांना पडलाय. जाहीरनाम्यातही लाडक्या बहिणींना १५०० रूपयांवरून २१०० देऊ, असं महायुतीनं नमुद केलं होतं. पण त्याची पूर्तता काही झालेली नाही. यासंदर्भात ठाकरे गटाचे आमदार वरूण सरदेसाईंनी विधानसभेत तीन प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नांवर मंत्री आदिती तटकरेंनी उत्तर दिलंय. तसेच २१०० रूपये मिळणार का नाही, याबाबत उत्तर दिलंय.
ठाकरे गटाचे आमदार वरूण सरदेसाई यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात विधानसभेत तीन प्रश्न उपस्थित केले होते. त्या तीन प्रश्नांमध्ये सरदेसाईंनी त्यात २१०० रूपयांचा देखील मुद्दा मांडला. यावर मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर दिलं आहे.
२१०० रूपयांचं काय होणार?
'महायुती सरकारनं ही योजना आणलीय. महिलांना १५०० रूपयांचा लाभ देणारं महायुती हे एकमेव सरकार आहे. महिलांना या योजनेचा लाभ कायम मिळत राहिल. २१०० रूपये संदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून योग्य निर्णय घेतील. परंतु लाडकी बहिणींची फसवणूक होणार नाही, असं आदिती तटकरे म्हणाल्या आहेत.
२१०० रूपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणालेत?
'लाडकी बहीण योजनेसाठीचा हप्ता २१०० रूपये करण्याबाबत आमचं काम चालू आहे. त्याचबरोबर अर्थसंकल्पाचं संतुलन कायम राखणंही तितकंच महत्त्वाचं आहे. जर आपल्याला शाश्वात पद्धतीनं योजना कायम चालू ठेवायच्या असतील, तर आर्थिक शिस्तही महत्त्वाची आहे. आम्ही दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करणार आहोत, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.