Dharashiv: धाराशिवकरांच्या मदतीला 'लाडकी' धावली, खात्यात आलेले ₹१५०० पूरग्रस्तांना दिले
धाराशिवमध्ये पुरपरिस्थिती
राज्याच्या वेगवेगळ्या भागातून केली जातेय मदत
लाडक्या बहिणींनीही केली धाराशिवकरांना मदत
राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. धाराशिवमध्ये अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे. नागरिकांचे खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणांहून त्यांना मदत पाठवली जाते. त्यानंतर आता राज्य सरकार आणि अनेक नागरिकांनीदेखील मदत केली आहे. यानंतर आता धाराशिवच्या नागरिकांसाठी लाडक्या बहिणींनी पुढाकार घेतला आहे.
धाराशिवकरांच्या मदतीला लाडक्या बहिणी (Women Help Dharashiv People)
धाराशिव जिल्ह्यात पावसाने अक्षरशः थैमान घातल्याने सगळीकडेच पूर परिस्थिती निर्माण होऊन गावच्या- गाव ओस पडली.अनेकांचा संसार उद्धवस्त झाला. यामुळे छोटीशी मदत म्हणून उमरगा तालुक्यातील चिंचोली भुयार येतील कविता दत्ता चौधरी यांनी ऑगस्ट महिन्याचा शासना कडून मिळालेला लाडकी बहिणी योजनाचा हप्ता 1500 रु पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून मुख्यमंत्री साहय्यता निधीला ऑनलाईन पाठवून देऊन, सर्व लाडक्या बहिणी पूरग्रस्तांना मदत करावी असे आवाहन केलय. गावातील एका महिलेमुळे इतर महिलांनीदेखील धाराशिवच्या नागरिकांना मदत करण्याचे ठरवले आहे.
अनेकांनी केली पुरग्रस्तांना मदत
धाराशिव, अहिल्यानगर, सोलापूर येथे पूरपरिस्थिती आहे. यामुळे अनेकांची घरेदेखील वाहून गेली आहे.नागरिकांना जीवनावश्यक वस्तूदेखील मिळत नाहीये. त्यामुळे अनेक ठिकाणाहून अन्नधान्य, जीवनावश्यक पाठवल्या जात आहे. महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिनदेखील पाठवण्याची विनंती आदिती तटकरेनी पालकमंत्र्यांना केली आहे. त्यानंतर आता त्यांच्या मदतीला लाडक्या बहिणीदेखील आल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.