'लाडकी'च्या खात्यात 6 हजार येणार? महिला वर्गात आनंदाचे वातावरण

Ladki Bahin Yojana 6000 Rupees Payment News: लाडकी बहिण योजनेचा जानेवारीचा हप्ता अद्याप अनेक लाभार्थ्यांना मिळालेला नाही. तर काही महिलांचे ३ ते ४ हप्ते थकलेले आहेत. ई-केवायसी दरम्यान झालेल्या चुकांमुळे लाभार्थीचे हप्ते रोखले गेले असल्याची माहिती आहे. मात्र आता लाडकींना मोठा दिलासा मिळणार आहे.
Women beneficiaries await pending installments under the Ladki Bahin Yojana after completing e-KYC.
Women beneficiaries await pending installments under the Ladki Bahin Yojana after completing e-KYC.Saam Tv
Published On

रखडलेले हप्ते एकत्र मिळणार?

एकदा e-KYC दुरुस्ती आणि पडताळणी पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर 2025, जानेवारी 2026 आणि फेब्रुवारी 2026 किंवा मार्चपर्यंतचे हप्ते मिळण्याची शक्यता आहे. प्रति महिना 1500 प्रमाणे एकत्रित 4,500 किंवा 6,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अधिकृत तारीख अजून जाहीर झालेली नाही. काही जिल्ह्यांमध्ये निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पैसे मिळण्यास विलंब झाला होता. पण आता DBT द्वारे पेमेंट सुरू होण्याची अपेक्षा आहे.

राज्य सरकारने ई-केवायसीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

कशी कराल ई-केवायसी दुरुस्ती ?

राज्य सरकारची वेबसाईट ladakibahin.maharashtra.gov.in

ई-केवायसी सेक्शनमध्ये लॉगिन करा (आधार/मोबाइल नंबर वापरा)

चुकीची माहिती (उदा. कुटुंबातील सरकारी नोकरी, उत्पन्न इ.) दुरुस्त करा

आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

दुरुस्तीनंतर तालुका स्तरावरील समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतर रखडलेले पैसे जमा होतील

विधानसभा निवडणुकीपूर्वी जुलै 2024 मध्ये लाडकी बहिण योजना सुरु झाली. अर्ज पडताळणीत निकषात न बसलेल्या लाडकींचा लाभ बंद झाला आहे. आता ई-केवायसी झालेल्या लाडकींना 2026 नवीन वर्षात कधी हफ्ता मिळणार याची उत्सुकता आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com