लाडकी बहीण योजनेतून ६० लाख महिलांना वगळणार; आमदाराला भीती, लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं!

Rohit Pawar on Ladki Bahin Yojana : सरकारने २८ लाख महिलांची नावे लाडकी बहीण योजनेमधून कमी केली आहेत. ते आता ५० ते ६० लाख महिलांची नावे कमी करणार आहेत, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojanax
Published On
Summary
  • लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरुन आमदार रोहित पवार आक्रमक.

  • योजनेतून २८ लाख महिलांची नावे कमी करण्यात आली आहेत.

  • आता ६० लाख महिलांची नावे कमी करणार असल्याचा आरोप.

Ladki Bahin Yojana Updates : लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. लाडकी बहीण योजनेतून आता २८ लाख महिलांची नावे कमी करण्यात आली आहेत. आणखी अटी लावून ५० ते ६० लाख महिलांची नावे योजनेतून कमी करणार असल्याचा आरोप त्यांना केला आहे. रोहित पवार पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

'मतदान मिळवण्यासाठी महायुती सरकारने या योजना आणल्या होत्या. लाडकी बहीण योजनेमध्ये २८ लाख महिलांची नावे कमी करण्यात आली आहे. यामध्ये धार्मिक पर्यटन अशी एक योजनाही बंद करण्यात आली. शिक्षणासाठी काही योजना आणल्या होत्या, त्यादेखील बंद करण्यात आल्या. आनंदाचा शिधाही बंद करण्यात आला लोकांचा वापर करुन आता त्यांना हे विसरले आहेत. निवडणूका संपल्या विषय संपला', असे रोहित पवार म्हणाले.

Ladki Bahin Yojana
IND Vs WI Test : वेस्ट इंडिजच्या शेपटाने भारताला झुंजवले! कॅम्बेल, होप यांच्या शतकानंतर १० व्या विकेटच्या जोडीने रडवले

'लाडकी बहीण योजना जेव्हा आणण्यात आली तेव्हा आम्ही बोललो होतो की, २४ ते २५ लाख महिलांची नावे योजनेतून काढतील अशी भीती आहे. त्याला उत्तर देताना मंत्र्यांनी आम्ही कुठेही कोणाचे नाव कमी करणार नाही, असे सांगितले होते. आता योजनेतून तब्बल २८ लाख महिलांची नावे कमी केली आङेत. आणखी अटी लावून ५० ते ६० लाख महिलांची नावे कमी करु शकतील', असे वक्तव्य रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत केले.

रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना आगामी निवडणुकीचा उल्लेख केला. ते म्हणाले, 'स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी ते थांबलेले आहेत. स्वत: योजना बंद करतील नाहीतर कोणालातरी कोर्टात पाठवतील आणि कोर्टाच्या माध्यमातून या योजना बंद करायला लावतील. कॉन्ट्रॅक्टरची हेयर रक्कम देण्यासाठी मोठे मोठे कर्ज काढली जातात. शक्ती महामार्गात सरकारमध्ये असलेल्या नेत्यांनी २५ ते ३० हजार कोटींचा मलिदा मिळणार आहे. ते देण्यासाठी त्यांच्याकडे पैसा आहे. पण लोकांना मदत करण्यासाठी, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी यांच्याकडे पैसा नाही.'

Ladki Bahin Yojana
Gold Silver Price : दिवाळीआधी चांदीच्या दरातही रेकॉर्डब्रेक वाढ, जाणून घ्या सोने-चांदीचे नवे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com