ED चा अधिकारी असल्याचं सांगून महिलेलं घातला 50 हजार रुपयांना गंडा

क्रांती चाैक पाेलिस घटनेचा कसून तपास करीत आहेत.
chhatrapati sambhaji nagar crime news, police, women
chhatrapati sambhaji nagar crime news, police, womenSaam tv
Published On: 

- नवनीत तापडिया

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : मी ईडी खात्याचा अधिकारी असल्याची बतावणी करुन एका महिलेला 50 हजार रुपयांना फसविल्याची घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडली. या प्रकरणी एका अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  (Maharashtra News)

chhatrapati sambhaji nagar crime news, police, women
Sindhudurg News : ठाकरे गट राष्ट्रवादीत विलीन... नितेश राणेंच्या विधानावर नाईक म्हणाले, हिम्मत असेल तर...

पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी घटनेबाबत दिलेली माहिती अशी - ईडी (ED) अधिकारी असल्याची बतावणी करीत मला सरकारी सहायता निधीच्या सर्व योजनांची पूर्ण माहिती आहे. मी तुमच्या गुडघ्याच्या व तुमच्या पतीच्या अँन्जीओप्लास्टीच्या शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दहा लाख रुपये मिळवून देतो असे एका महिलेला अज्ञात व्यक्तीने सांगितले.

chhatrapati sambhaji nagar crime news, police, women
Satara News : मर्यादा पाळा, अन्यथा मला बंधनं झुकागरुन बाेलावं लागेल; शंभूराज देसाईंनी अजित पवारांना ठणकावले (पाहा व्हिडिओ)

संबंधित व्यक्तीने महिलेकडून 50 हजार रुपये घेतले. धक्कादायक गाेष्ट म्हणजे फोन पे या app वरून ही रक्कम वृद्ध महिलेकडून अज्ञाताने घेतली आहे. या प्रकरणी क्रांती चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्मिता अरविंद देशपांडे असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com