परप्रांतीयांना जमीन विकायची नाही,कोकणातल्या गावाचा आदर्श ठराव

Konkan Villages Protecting Local Land: परप्रांतीयांचा मुद्दा फक्त मुंबई पुरता नाही. कोकणातही परप्रांतीयांची घुसखोरी आणि त्यांनी मांडलेलं बस्तान हा ज्वलंत प्रश्न आहे. याच पार्श्वभूमिवर कोकणातल्या एका गावाने ऐतिहासिक निर्णय घेतलाय.
Morvane villagers during the Gram Sabha meeting where the historic land sale ban was passed.
Morvane villagers during the Gram Sabha meeting where the historic land sale ban was passed.Saam Tv
Published On

कोकणात कोकण रेल्वे विकासाची गंगा घेऊन आली मात्र परप्रांतीयांचे आक्रमणही झाले. परप्रांतीय कामगार आणि मच्छिमारांच्या घुसखोरीमुळे कोकणात विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. कोकणात 2016 मध्ये रिफायनरी प्रस्तावित करण्यात आली. रत्नागिरीतील बारसू, नाणार येथे त्याला तीव्र विरोध झाला. कोकणातील जमिनींना मोठा भाव आलाय. अनेक परप्रांतीयांनी आणि धनदांडग्यांनी इथल्या जमिनींवर डल्ला मारलाय..

या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातील मोरवणे गावाने एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय. गावातील जमीन परप्रांतीयांला विकायची नाही असा ठरावच ग्रामसभेत करण्यात आलाय पैशाची गरज असल्यास आणि जमीन विकायची झाल्यास गावातीलच व्यक्तीलाच जमीन विकायची असा निर्णय एकमताने घेण्यात आलाय.

मोरवणे गावच्या य़ा निर्णयाच्या पार्श्वभूमीवर कोकणातली सद्यस्थिती काय आहे पाहूया... पर्यटनाची चलती आणि येऊ घातलेले प्रकल्प यामुळे कोकणात अनेक श्रीमंत लोक, कंपन्या स्थानिकांच्या जमिनी घेऊन गुंतवणूक करीत आहेत. दुसरीकडे कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून परप्रांतीय कामगारांची संख्या वाढली आहे. ज्यामुळे स्थानिक व्यावसायिकांवर दबाव येत आहे. मासेविक्रीपासून ते शेतमजुरी, घरकाम, रंगकाम, सुतारकाम आणि बांधकाम या क्षेत्रांमध्ये परप्रांतीयांनी स्थान मिळवले आहे. स्थानिकांच्या पारंपरिक व्यवसायांवरही त्यामुळे परिणाम झाला आहे.

पर्यटनाची चलती आणि येऊ घातलेले प्रकल्प यामुळे कोकणात अनेक श्रीमंत लोक, कंपन्या स्थानिकांच्या जमिनी घेऊन गुंतवणूक करीत आहेत. दुसरीकडे कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून परप्रांतीय कामगारांची संख्या वाढली आहे. ज्यामुळे स्थानिक व्यावसायिकांवर दबाव येत आहे. मासेविक्रीपासून ते शेतमजुरी, घरकाम, रंगकाम, सुतारकाम आणि बांधकाम या क्षेत्रांमध्ये परप्रांतीयांनी स्थान मिळवले आहे. स्थानिकांच्या पारंपरिक व्यवसायांवरही त्यामुळे परिणाम झाला आहे.

कोकणात काही ठिकाणी परप्रांतीयांकडून परवानगीशिवाय सण साजरे केले जात आहेत. ज्यामुळे स्थानिक संस्कृतीवरही आक्रमण होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. एकूणच परप्रांतीयांचा वाढता दबाव थोपवण्यासाठी मोरवणे गावाने उचललेले पाऊल इतर गावांसाठीही प्रेरणा देणारे आहे. महाराष्ट्राची ही देवभूमी सुरक्षित राहणे, स्थानिकांचा उत्कर्ष होणे याला जास्त महत्व आहे. म्हणूनच इतर गावांनीही मोरवणेचा आदर्श घ्यायला हवा..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com