दादांच्या निधनानंतरही राष्ट्रवादीचा डंका; कोल्हापूर झेडपीत सर्वात मोठा पक्ष

Kolhapur Zilla Parishad Election Result 2026: कोल्हापूरांनी दादांच्या राष्ट्रवादीला भरभरुन साथ दिलीय... त्यामुळे कोल्हापूरमध्ये सत्तांतर होण्याची शक्यता आहे...मात्र कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या आहेत.
NCP leaders celebrate as the party emerges as the largest force in Kolhapur Zilla Parishad elections.
NCP leaders celebrate as the party emerges as the largest force in Kolhapur Zilla Parishad elections.Saam Tv
Published On

ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या धामधुमीतच अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला.... मात्र दादांच्या अकाली मृत्यूनंतरही कोल्हापूरकरांनी राष्ट्रवादीला साथ दिलीय... कोल्हापूरात दादांच्या राष्ट्रवादीनं 20 जागा पटकावून सर्वात मोठा पक्षाचा मान मिळवलाय. त्यामुळे कोल्हापूरच्या अध्यक्षपदी दादांच्या राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता बसेल, असा विश्वास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलाय...

दुसरीकडे काँग्रेसनंही महायुतीपुढं तगडं आव्हान उभं करत 15 जागांपर्यंत मजल मारलीय.. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी सतेज पाटील यांना खांद्यावर घेत जल्लोष केलाय..

कोल्हापूर जिल्हा परिषदेतील संख्याबळ नेमकं कसं आहे...

राष्ट्रवादी 20

काँग्रेस 15

भाजप 12

शिवसेना 9

जनसुराज्य 6

राजर्षी शाहू आघाडी 4

स्वाभिमानी शेतकरी संघटना 1

ठाकरेसेना 01

खरंतर ऐन प्रचारादरम्यान अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला.. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते दुःखात बुडाले... याच कारणाने प्रचारही थंडावला... मात्र कार्यकर्त्यांनी रडत न बसता लढण्याचा पर्याय निवडला आणि कोल्हापूरात आपणच दादा आहोत...हे सिद्ध केलंय... त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्तांतर झाल्यानं दादांच्या राष्ट्रवादीच्या हाती अध्यक्षपदाची सुत्रं राहणार हे जवळपास निश्चित मानलं जातंय.. त्यामुळे ऐनवेळी सूत्रं फिरणार की दादांच्या राष्ट्रवादीचा झेडपी अध्यक्ष होणार.. याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com