Kolhapur: लिंबू, कुंकू, अन् फोटोवर टाचण्या; कोल्हापुरातील शैक्षणिक संस्थेच्या संचालकावर करणीचा प्रकार

Black Magic in Kolhapur: कोल्हापुरातील नामवंत शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष व संचालकावर भानामतीचा प्रयत्न उघडकीस. स्मशानभूमीत फोटोवर लिंबू, कुंकू, टाचण्या वापरून करणी केल्याचा संशय व्यक्त.
KOlhapur Crime black magic
KOlhapur Crime black magicSaam Tv news
Published On

पुरोगामी विचारधारेसाठी ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा भानामतीसारख्या अंधश्रद्धेचा प्रकार उघडकीस आला आहे. कोल्हापूर शहरातील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग या नामवंत शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष आणि संचालक यांच्यावर भानामती करण्याचा प्रकार समोर आला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

वडकशिवाळे येथील स्मशानभूमीमध्ये संस्थेच्या अध्यक्ष व संचालकांचे फोटो ठेवून त्यावर कुंकू, हळद, लिंबू आणि टाचण्या मारून करणी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संस्थेच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंता व्यक्त होत असून, हा प्रकार नेमका कुणी केला? याचा तपास लवकरच केले जाणार आहे.

KOlhapur Crime black magic
Beed News: बीडमध्ये भीषण अपघात! दुचाकी समोरासमोर आदळल्या; तिघांचा जागीच मृत्यू, बाईकचा चक्काचूर

या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात अशा प्रकारचा अंधश्रद्धेचा शिरकाव होतोय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांकडून यासंदर्भात तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अंधश्रद्धेचा हा प्रकार नेमका कुणी आणि का केला? भानामतीचा प्रकार करण्यामागे नेमकं कारण काय? याचा तपास सुरू आहे.

मराठी भाषेसाठी ठाकरे बंधूंच्या मोर्चाला वारकरी संप्रदायाचा पाठिंबा

हिंदी भाषा सक्तीविरोधात आणि मराठी भाषेच्या अस्मितेसाठी ठाकरे बंधू एकत्र येऊन ५ जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाला आता वारकरी संप्रदायाचा देखील उत्स्फूर्त पाठिंबा लाभला आहे. विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी आज पंढरपूर येथून या मोर्चास आपला पाठिंबा जाहीर केला.

KOlhapur Crime black magic
Kalyan: वाईट नजर अन् मानसिक छळ, शिंदे गटाच्या नेत्याविरूद्ध दुसऱ्यांदा विनयभंगाचा गुन्हा; नेमकं घडलं काय?

गणेश महाराज शेटे यांनी स्पष्टपणे सांगितले की, "मराठी भाषा ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. तिच्या रक्षणासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यासाठी वारकरी संप्रदाय नेहमीच पुढे राहील." विशेष म्हणजे, सध्या पंढरपूरमध्ये आषाढी वारीचा सोहळा सुरू असतानाही वारकरी संप्रदायाने मराठी भाषेच्या समर्थनार्थ आपली ठाम भूमिका स्पष्ट केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com