Chandgad Vidhan Sabha : थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेले चंदगड निवडणुकीत तापणार; सहा पक्षांचा कस लागणार, कोण ठरणार वरचढ?

Kolhapur News : कोल्हापुरातील चंदगड विधानसभा मतदारसंघ हा राज्याचे लक्ष वेधून घेणारा एक महत्त्वाचा मतदार संघ आहे. या मतदारसंघात ३ लाख ४७ हजार मतदार संख्या आहे
Chandgarh Vidhan Sabha
Chandgarh Vidhan SabhaSaam tv
Published On

रणजीत माजगांवकर 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघाकडे सध्या राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघात महायुतीतच उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांच्या उमेदवारीला भाजपकडून सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. चंदगडचे भाजप नेते शिवाजी पाटील यांनी या मतदारसंघात गेल्या पाच वर्षांपासून आपली तयारी सुरू केली आहे. तर भाजपच्या संग्राम कुपेकर यांनी देखील आपल्याला उमेदवारी मिळावी; अशी मागणी केली आहे. या मतदारसंघात चौरंगी किंवा पंचरंगी लढत होण्याचे शक्यता निर्माण झालेली आहे.

कोल्हापुरातील (Kolhapur) चंदगड विधानसभा मतदारसंघ हा राज्याचे लक्ष वेधून घेणारा एक महत्त्वाचा मतदार संघ आहे. या मतदारसंघात ३ लाख ४७ हजार मतदार संख्या आहे. या मतदारसंघावर सध्या अजित पवारांच्या (NCP) राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राजेश पाटील आहेत. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत सहा पक्षांचा कस लागणार आहे. कारण या विधानसभेचे राष्ट्रवादी अजित पवार गट, भाजप यासह इतर पक्षांनी देखील निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. इतकेच नाही तर उमेदवारीवरून महायुतीतच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत. यामुळे आगामी काळात या मतदार संघात चांगलीच रंगत पाहण्यास मिळणार आहे. 

Chandgarh Vidhan Sabha
Selu Bajar Samiti : मालमत्ता कराचे थकविले ७५ लाख; थकबाकीपोटी सेलू कृउबाला लावले सील

भाजपचे शिवाजी पाटील तयारीत 

चंदगड (Chandgad) विधानसभा मतदार संघांमध्ये सध्या अजित पवार राष्ट्रवादी गटाचे आमदार राजेश पाटील असले तरीही भाजपचे नेते शिवाजी पाटलांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. कोणतेही पद नसताना कोट्यावधी रुपयांची विकास कामे शिवाजी पाटलांनी चंदगड मतदारसंघात केले आहे. तर शिवाजी पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत. त्यांनी जय जवान जय किसान हा महामेळावा घेऊन जणू विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. मेळाव्याला गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, यांच्यासह खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते. मेळाव्या दरम्यान मुरलीधर मोहोळ यांनी शिवाजी पाटील यांचं कौतुक करत विकास कामांचा पाढाच वाचलाय. शिवाजी पाटलांनी मतदार संघासाठी मागितला आहे, असा उल्लेख त्यांनी केला. तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी चंदगड मधून शिवाजी पाटील हाच उमेदवार असल्याची घोषणा केली.

Chandgarh Vidhan Sabha
Cyber Crime : शेतकऱ्याला ऑनलाईन गंडा; लिंक पाठवून सव्वादहा लाख केले लंपास

आरोप प्रत्यारोप 
दरम्यान याच मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राजेश पाटील हे देखील पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. यापूर्वी अजित पवार यांनी त्यांना निवडणूक लढवण्याबाबत ग्रीन सिग्नल देखील दिला आहे. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकास काम केल्याचा दावा देखील त्यांनी केला. त्यामुळे त्यांनी हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा असल्याचं सांगितलं आहे. तर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांवर खोचक शब्दात टीका केली आहे. तसेच शिवाजी पाटील यांच्या सर्व घडामोडींवर कोल्हापुर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीतील धोरणाप्रमाणे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंदगडमध्ये येऊन त्या उमेदवाराचे नाव जाहीर केले. त्यामुळे अजित पवार भाजपला योग्य ते दखल घ्यायला लावतील असेही त्यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे राजेश पाटलांच्याकडे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिलं जातं आहे. मात्र राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यामुळे याचा तोटा महायुतीला होणार आहे. त्यामुळे महायुतीने कोणत्याही परिस्थितीत निकष बदलून चंदगड विधानसभेचा उमेदवार बदलून भाजपला जागा द्यावी; अशी मागणी भाजपनेते संग्राम सिंह कुपेकर यांनी केली आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com