Kalamba Jail: कळंबा कारागृहात मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची हत्या प्रकरण, 5 कैद्यांना अटक

1993 Mumbai Bomb Blast Convicted Killed Case: कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात २ जून रोजी १९९३ बॉम्बस्फोटातील आरोपीची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणामुळे कोल्हापूर हादरले होते. याप्रकरणातील ५ ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
Kalamba Jail: कळंबा कारागृहात मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची हत्या प्रकरण, 5 कैद्यांना अटक
Kolhapur Kalamb Jail Breaking News: Saamtv

रणजीत माजगावकर, कोल्हापूर

कोल्हापूरातील कळंबा कारागृहातील (Kalamba Jail) १९९३ च्या बॉम्बस्फोटातील (1993 Mumbai Bomb Blast) आरोपीच्या खून प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी (Kolhapur Police) ५ कैद्यांना अटक केली आहे. कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिसांनी पाचही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींना कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे. २ जून रोजी कळंब कारागृहामध्ये हत्येची ही घटना घडली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी मुन्ना खान उर्फ मनोजकुमार भवरलाल गुप्ता याची २ जून रोजी हत्या करण्यात आली होती. कळंब कारागृहामध्ये कैद्यांनीच मुन्ना खानची हत्या केली होती. कारागृहातील ५ न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या कैद्यांनी ड्रेनेजच्या लोखंडी झाकणाने मुन्ना खानची हत्या केल्याचे तपासात उघड झाले होते. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी पाचही कैद्यांना अटक केली.

Kalamba Jail: कळंबा कारागृहात मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची हत्या प्रकरण, 5 कैद्यांना अटक
Kolhapur News : पाण्यासाठी नागरिकांनी अडवला रस्ता; कोल्हापूरच्या वारे वसाहत परिसरात पाण्याच्या समस्येने नागरिक हैराण

१९९३ सालच्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी मुन्ना खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता हा २ जून रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कळंब कारागृहातील हौदावर अंघोळीसाठी गेला होता. यावेळी कारागृहातील इतर कैद्यांसोबत त्याचा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की शाब्दिक बाचाबाचीनंतर कैद्यांमध्ये हाणामारी सुरू झाली. यावेळी कैद्यांच्या एका गटाने मुन्ना खानला बेदम मारहाण केली. है कैदी ऐवढ्यावरच थांबले नाही तर ड्रेनेजच्या लोखंडी झाकणाने त्यांनी मारहाण केली. या मारहाणीत मुन्ना खान गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

Kalamba Jail: कळंबा कारागृहात मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची हत्या प्रकरण, 5 कैद्यांना अटक
Pune Porsche Car Accident: ससूनच्या शिपायाला ३ लाख रुपये कुणी आणि कुठे दिले?, CCTV तपासातून समोर आली मोठी अपडेट

याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी प्रतिक उर्फ पिल्या पाटील, दीपक खोत, संदीप चव्हाण, ऋतुराज इनामदार आणि सौरभ सिद या कैद्यांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. या पाचही आरोपींना आज कोर्टात हजर केले जाणार आहे. दरम्यान, कळंब कारागृहात सातत्याने गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडत असतात. असे असताना देखील कारागृहात नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Kalamba Jail: कळंबा कारागृहात मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची हत्या प्रकरण, 5 कैद्यांना अटक
Mumbai Local Train News: लोकल गर्दीचा २४ वा बळी; मुंब्रा ते दिवा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून तरुणाचा मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com