काेल्हापूर : सत्ता मिळवण्याच्या राक्षसी प्रवृत्तीमूळ कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लादल्याची टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांनी खासदार संजय मंडलिक (sanjay mandlik) यांच्यावर केली आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी (kolhapur district bank election) आज मतदानास प्रारंभ झाला आहे. या बॅंकेवर सत्ता मिळवावी यासाठी काॅंग्रेसचे (congress) मंत्री सतेज पाटील (satej patil) आणि राष्ट्रवादीचे (ncp) मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) आणि शिवसेना (shivsena) खासदार संजय मंडलिक (sanjay mandlik) यांच्या पॅनेलमध्ये लढत आहे. (kolhapur district central coperative bank election latest updates)
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी (kolhapur district central coperative bank election) २१ पैकी १५ जागांसाठी पहिल्या दोन तासांत १७.६१ टक्के झाले मतदान झाले आहे. दुपारनंतर मतदानाची टक्केवारी वाढेल अशी शक्यता आहे.
बँकेच्या कारभारावर विरोधक टीका करत नाहीत. बँकेचा कारभार चांगला सुरू आहे. त्यामुळे आमचा विजय प्रचंड मतांनी होईल असाही दावा मुश्रीफ यांनी केला आहे. दरम्यान काेल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी दुपारी १२ वाजेपर्यंत मतदारांचा उत्साह कायम हाेता.
edited by : siddharth latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.