Ahmednagar: दुष्काळी गाव झालं हिरवंगार; नगरमधील 'झाडांचे गाव' आहे तरी कुठं?

Ahmednagar Tree Village: आज हे गाव 'झाडांचे गाव' म्हणून ओळखले जात आहे.
Ahmednagar News
Ahmednagar NewsSaam tv
Published On

सचिन बनसोडे

Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यातील अंजनापूर हे गाव कधीकाळी दुष्काळी गाव म्हणून ओळखले जायचे. मात्र गेल्या नऊ वर्षात येथील ग्रामस्थांनी वृक्षारोपणाची मोहीम प्रभावीपणे राबवली. आज हे गाव 'झाडांचे गाव' म्हणून ओळखले जात आहे. ग्रामस्थांनी नऊ वर्षात दहा हजार झाडे लावून गावाचा कायापालट केला आहे. (Latest Marathi News)

गावकऱ्यांचा शेती मुख्य व्यवसाय

कोपरगाव तालुक्यात अडीच हजार लोकसंख्या असलेले अंजनापूर गाव. नऊ वर्षांपूर्वी या गावाची ओळख दुष्काळी गाव म्हणून होती. शेती हा इथला मुख्य व्यवसाय आहे. मात्र घटत्या पर्जन्यमानामुळे गावची परिस्थिती अशी की शेतीसह पिण्याचे पाणी देखील शेजारील गावांकडून विकत घ्यावे लागत असे.

Ahmednagar News
Airoli Katai Naka Freeway: डोंबिवली-बदलापूरकरांचा प्रवास सुकर होणार; ऐरोली-काटई नाका महामार्गाबाबत समोर आली मोठी अपडेट

गाव छोटेसे असले तरी सध्या इथे ३०० हून अधिक इंजिनिअर, २५० सरकारी सेवतील अधिकारी आणि कर्मचारी तसेच ५० उद्योजक आणि व्यावसायिक असे उच्च शिक्षित ग्रामस्थ आहेत. या सर्वांनी एकत्र येत गावासाठी काहीतरी करण्याचा निर्धार केला आणि त्यातूनच 'एक वृक्ष जीवनाचा' ही संकल्पना अंमलात आली.

वृक्ष चळवळीतील योगदान

२०१५ साली वृक्षारोपणाची व्यापक मोहीम सुरू झाली आणि मागील नऊ वर्षात गावात कडूनिंब, चिंच, आंबा, वड, पिंपळ अशी ऑक्सिजन देणारी दहा हजार झाडे लावून त्यांचे संगोपन करण्यात आले आहे. झाड म्हणजे कुटुंबातील एक सदस्य या भावनेतून सर्व ग्रामस्थ या वृक्ष चळवळीत आपले योगदान देत आहेत.

नऊ वर्षात अंजनापूर हे गाव हिरवळीने नटले असून पर्जन्यमान वाढल्याने एकेकाळी ज्या गावांकडून पाणी विकत घ्यायचे आता त्याच गावांना अंजनापूर पाणी पुरवते. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांसह सर्वच ग्रामस्थांचे जीवनमान बदलले आहे. वृक्षरोपणाच्या चळवळीने गावाची ओळख बदलली असून 'झाडांचे गाव' अशी नवी ओळख अंजनापूरची झाली आहे.

गावातील उच्च शिक्षित लोक कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास असले तरी सोशल मिडीयाच्या माध्यमातून ते एकमेकांशी संपर्कात असतात. दरवर्षी गावात जुलै महिन्यात राबवण्यात येणाऱ्या वृक्षारोपण सप्ताहासाठी सर्व एकत्र येतात आणि तन-मन-धनाने आपले योगदान देतात.

Ahmednagar News
#Shorts : Tomato Price News | सर्वसामान्यांना दिलासा, टोमॅटोचे दर होणार कमी!

दुष्काळी गाव आता...

अंजनापूर ग्रामस्थांनी हजारो झाडे लावून गावाचा केलेला कायापालट इतरांसाठी देखील प्रेरणादायी आहे. त्यामुळे 'एकेकाळी दुष्काळी गाव आता काय झाडी, काय हिरवळ, समदं बदललं राव..' असं म्हंटल तर वावग ठरू नये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com