Kishori Pednekar: जिथे-जिथे भाजपची सत्ता नाही, तिथे हा त्रास, म्हणून घरात घाबरुन बसणार नाही - महापौर

या कारवाईनंतर शिवसेना अत्यंत आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे.
Kishori Pednekar
Kishori PednekarSaam Tv
Published On

रश्मी पुराणिक -

मुंबई: आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष आणि शिवसेनेचे (Shivsena) नेते यशवंत जाधव यांच्या घरावर धाड टाकली. त्यानंतर सध्या त्यांची चौकशी सुरु आहे. या कारवाईनंतर शिवसेना अत्यंत आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या स्वत: यशवंत जाधवांच्या घरी पोहोचल्या (Kishori Pednekar Supports Yashwant Jadhav And Criticize BJP).

Kishori Pednekar
Yashwant Jadhav Income Tax Raid: शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या घरी आयकर विभागाची धाड, नेमके आरोप काय?

...म्हणून मी जाधवांच्या घराबाहेर आले - किशोरी पेडणेकर

"आयकर विभागाची धाड ही काही पहिल्यांदा कुणावर पडतेय असं नाही. आयटी फॉर्म भरताना काही त्रुटी राहिल्य़ा असतील, या यंत्रणा कायद्याच्याचौकटीत राहून काम करणाऱ्या आहेत. त्यामुळे त्यांना सहकार्य करतील, त्यांना जी माहिती हवीये ती जाधव देतील", असं किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) म्हणाल्या.

"जेव्हा असं काहीतरी घडतं तेव्हा आमचा शिवसैनिक कुठेतरी चुकीचा वागू शकतो, त्यांनी पोलिसांना, यंत्रणेला मदत केली पाहिजे तसेच, शिवसैनिकाकडून कुठलंही अनुचित काही घडू नये, म्हणून मी इथे आलीये".

"यशवंत जाधव (Yashwant Jadhav) हे या धाडीला हवी ती उत्तरं देतील, ते कोणाला घाबरणारे नाहीत. या धाडीला घाबरुन आम्ही का लपून राहाणार. आज तुम्ही ज्या पद्धतीने केंद्रीय यंत्रणेचा वापर करत आहात ते महाराष्ट्र, मुंबई बघतेय. जिथे जिथे भाजपची सत्ता नाही तिथे हा त्रास सगळ्यांना होतो आहे. हा फक्त महाराष्ट्र किंवा मुंबईला होत नाहीये. झारखंडड, पश्चिम बंगाल, पंजाबमध्येही हा त्रास होतोय. त्रास होतोय म्हणून घरात घाबरुन बसणार नाही".

"माझं नाव किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी घेतलं. ते काय ते 8 गाळे वगैरे बोलत आहेत, मला तर माहित नाही पण जर माझा भाऊ बोलत असेल आणि देत असले तर मी ते घ्यायला तयार आहे", अशा शब्दांत किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे.

Kishori Pednekar
शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाची धाड

"निवडणूक तोंडावर त्रास देणे याने शिवसेना डॅमेज होत नाही"

"या यंत्रणा दुधारी तलवार आहे. त्या दोन्हीकडून वापरली जाऊ शकतात. निवडणुकीच्या तोंडावर आणि सत्ता गेल्यापासून काय बुडाला आग लागलीये हे महाराष्ट्र बघतेय.निवडणूक तोंडावर त्रास देणे याने शिवसेना डॅमेज होत नाही".

"अशा पद्धतीने मीडियाच्या माध्यामातून बोंबाबोंब करतात, हा असुरी आनंद मिळणार नाही. जे समोर आहे ते लोकांच्या समोर येईल. केंद्रीय यंत्रणा तपास करत आहे त्यांना डिस्टर्ब करायचं नाही", असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

यशवंत जाधव यांच्यावरील आरोप काय?

यशवंत जाधवांवर 15 कोटी घोटाळ्याचा आरोप आहे. हे 15 कोटी रूपये यूएईला हलवल्याचा सोमय्यांनी आरोप केला होता. बनावट कंपन्यांच्या माध्यमातून15 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.

जानेवारी महिन्यात किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांची मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप केला होता. एवढेच नाही तर आयकर विभागाच्या हाती पुरावे लागले आहेत. जाधव यांचे पितळ उघडे करण्यासाठी आयकर विभागाला पाठपुराव्यास मदत करणार असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले होते.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com