
संगमनेर तालुक्यातील कीर्तनात राड्यानंतर राजकीय वाद चिघळला
अमोल खताळ - थोरात यांच्यात वार- पलटवार
खताळ म्हणाले थोरातांचा डीएनए तपासावा
थोरातांचा सवाल, म्हणाले, डीएनए म्हणजे काय माहीत आहे का?
सचिन बनसोडे, संगमनेर/ अहिल्यानगर | साम टीव्ही
किर्तनात झालेल्या राड्यानंतर राजकीय आखाडा प्रचंड तापला आहे. बाळासाहेब थोरात आणि अमोल खताळ या दोघांनीही एकमेकांविरोधात दंड थोपटले आहेत. खताळ यांनी टीकेचा वार केल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी जोरदार पलटवार केला आहे.
बाळासाहेब थोरात यांना औरंगजेबाचा पुळका येत असेल तर त्यांचा डीएनए (DNA) तपासावा लागेल, असं वक्तव्य आमदार अमोल खताळ यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता असून बाळासाहेब थोरात यांनी खताळ यांना प्रत्युत्तर दिलं आहे. DNA काय असतो ते अमोल खताळ यांना माहीत देखील आहे का? त्यांच्याकडे बौद्धिक पातळी नाही, त्यामुळे कुणीतरी लिहून दिलेलं त्यांनी वाचलं असेल, असा खोचक टोला थोरात यांनी लगावला.
संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे कीर्तनात झालेल्या राड्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. कीर्तनकार संग्राम भंडारे हे औरंगजेब आणि अफजल खानाचे उदाहरण देत असल्याने बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी चालू कीर्तनात गोंधळ घातल्याचा आरोप आमदार अमोल खताळ यांनी केला.
या प्रकारानंतर त्याच्या निषेधार्थ आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वात संगमनेर येथे काल हिंदुत्ववादी संघटनांनी रास्तारोको आंदोलन केलं. भाषणादरम्यान आमदार अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरातांवर टीका करताना थेट त्यांचा DNA तपासण्याचे वक्तव्य केले. आम्ही मामाला टेकवला, आता भाच्याला अर्थात आमदार सत्यजीत तांबे यांना देखील टेकवू, अशी टीका खताळ यांनी केली.
खताळ यांच्या टीकेला बाळासाहेब थोरात यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. खताळ यांचे वक्तव्य म्हणजे खालच्या पातळीच्या राजकारणाचे उदाहरण आहे. DNA काय असतो ते अमोल खताळ यांना माहीत देखील आहे का?. त्यांच्याकडे बौद्धिक पातळी नाही, त्यामुळे कुणीतरी लिहून दिलेलं त्यांनी वाचलं असेल, असं थोरात म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.