मामाच्या गावाला जायला चिमुकली निघाली; महिलेनं मुलीला पळवलं अन् अंगावरील सोनं - पैंजण लंपास करत.. | Solapur

Minor Girl Abducted from Solapur Bus Stand: सोलापूर बसस्थानकावरून चिमुरडीचे अपहरण; सहा तासांत पोलिसांनी शोधून काढले. मुलीसंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होताच..
Solapur
SolapurSaam
Published On

मामाच्या गावी जाण्यासाठी सोलापूर बसस्थानकावर आलेल्या अवघ्या अडीच वर्षांच्या चिमुरडीला एका अनोळखी महिलेने फसवून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिच्या कानातील सोन्याच्या रिंग आणि पायातील पैंजण काढून घेत, संबंधित महिलेनं तिला मोडनिंब येथे सुरू असलेल्या लग्नसमारंभात सोडून दिलं. सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्यानंतर केवळ सहा तासांत चिमुकलीला तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आलं.

बावी येथील राजाभाऊ माळी यांच्या मुलीचं लग्न मोडनिंबमधील एका मंगल कार्यालयात सुरू होते. अक्षता कार्यक्रमात चिमुरडी जोरजोरात रडायला लागली. वऱ्हाडींचं लक्ष त्या चिमुरडीवर गेलं. तिला विचारले असता, ती फक्त "मी सोलापूरची आहे" एवढंच सांगत होती. या नंतर राजाभाऊ माळी यांनी तिचा फोटो आणि माहिती सोशल मीडियावर शेअर केली.

Solapur
Hair Transplant: हेअर ट्रान्सप्लांट जीवाशी, १५ दिवसांत चेहऱ्याचा आकारच बदलला; फोटो पाहून अंगावर येईल काटा

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सोलापूर बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. फुटेजमध्ये एक महिला मुलीला घेऊन जाताना दिसली. पोलिसांनी वेळ न दवडता तपास सुरू करत केवळ सहा तासांत मुलीचा शोध घेतला आणि आई वडिलांच्या स्वाधीन केले.

Solapur
Pune Crime: ब्रेकअपनंतर बॉयफ्रेंडनं शरीरसंबंधाचे व्हिडिओ केले व्हायरल, थेट पॉर्न साईटवर टाकले, मैत्रिणीने पाहताच...

मुलीला पळवून नेणारी महिला अद्याप फरार असून, पोलिसांकडून तिचा कसून शोध सुरू आहे. या घटनेनंतर बसस्थानक आणि गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांबाबत अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Solapur
Crime: बकऱ्या चारणाऱ्या वृद्धासमोर नग्न होऊन व्हिडिओ करणारी तरुणी सॉफ्टवेअर इंजिनीअर, धक्कादायक माहिती उघड, सगळेच हैराण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com