विकासकामांच्या नावाखाली 100 कोटींचा घोटाळा? नगरसेविकेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Khopoli Municipal Council Dispute: रायगडच्या खोपोली नगरपरिषदेत विकासकामांमध्ये 100 कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराचे आरोप झालेत. भाजप नगरसेविका सानिया शेख यांनी चौकशीची मागणी केली आहे. नगरपरिषदेकडून आरोप फेटाळण्यात आले आहेत.
Khopoli Municipal Council Dispute:
Khopoli Municipal Council Rs 100 crore alleged irregularities in development workssaam tv
Published On
Summary
  • खोपोली नगरपरिषदेतील विकासकामांमध्ये 100 कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराचा आरोप

  • नगरसेविका सानिया मोहसीन शेख यांनी मुख्यमंत्री आणि संबंधित विभागांकडे तक्रार करून सखोल चौकशीची मागणी केली

  • दोषी अधिकाऱ्यांवर निलंबन आणि फौजदारी कारवाई करण्याची मागणी

सचिन कदम,साम प्रतिनिधी

रायगडच्या खोपोली नगरपरिषदेत विकासकामांच्या नावाखाली तब्बल 100 कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. भाजपच्या खोपोली नगरपरिषदेच्या नगरसेविका सानिया मोहसीन शेख यांनी याबाबत थेट मुख्यमंत्री आणि संबंधित विभागांकडे तक्रार दाखल करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. (Khopoli Municipal Council: Rs 100 Crore Alleged Irregularities Spark Controversy)

निविदा प्रक्रिया, कार्यादेश, बिलांपासून विकासकामांच्या गुणवत्तेपर्यंत अनेक मुद्द्यांवर त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रभाग क्रमांक 6 मधील सुमारे 73 लाख रुपयांच्या क्रिकेट टर्फ आणि लोखंडी स्ट्रक्चरच्या कामावरूनही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर निलंबन आणि फौजदारी कारवाई करण्याची मागणी भाजपच्या नगरसेविका सानिया शेख यांनी केली आहे.

Khopoli Municipal Council Dispute:
FDAची जुहूतील इस्कॉनच्या अन्न आस्थापनांवर मोठी कारवाई; 3 फूड युनिट्सचे परवाने निलंबित

दरम्यान, खोपोली नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून त्यांनी त्यांची बदनामी केल्याप्रकरणी भाजप नगरसेविका यांच्या विरोधात कोर्टात मानहानीचा दावा दाखल केला आहे तर खोपोली नगरपरिषदेचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी देखील हे सर्व आरोप फेटाळले असून या आरोपांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं नगराध्यक्ष शेंडे म्हणालेत.

खपोली नगरपरिषदेच्या प्रशासकीय काळात नगरपालिकेचा कार्यभार हा नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे होता. नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये नगरसेवक आणि नगरसेविका निवडून आल्या. त्यात भाजपच्या नगरसेविका सानिया शेख या निवडून आल्या. सानिया शेख यांनी प्रशासकीय काळात झालेल्या कामांची माहिती घेतली. त्यात गैरकारभार झाल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला.

Khopoli Municipal Council Dispute:
शेतकरी आणि जमीनधारकांसाठी महत्त्वाची बातमी; ७/१२ पासून ते भू-नकाशांपर्यंत सगळी माहिती एका क्लिकवर

प्रशासकीय काळात अनेक गार्डन्सचे सुशोभीकरण करण्याचे कंत्राट काढण्यात आले. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला. सानिया शेख यांनी या कामांची कागदपत्रे तपासली त्यात जवळपास शंभर कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. दरम्यान या आरोपामुळे खोपोलीमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करून चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

दुसरीकडे भाजपच्या नगरसेविकांच्या या आक्रमक भूमिकेला मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी खुले आव्हान दिलंय. त्यांनी हे आरोप खोटे व बदनामीकारक असल्याचा दावा केला आहे. प्रशासकीय कारकिर्दीत शंभर कोटीची बिले अदा झाली नाहीत. अर्धवट माहितीच्या अधारे नगरपरिषदेची बदनामी केली आहे. त्यामुळे मानहानीची नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती सुत्रांनी दिलीय. यासर्व प्रकरणामुळे भाजपच्या नगरसेविका सानिया शेख आणि मुख्याधिकारी पंकज पाटील यांच्यामधील वाद आता पेटला आहे. यामध्ये काय गौडबंगाल आहे त्याचे सत्य चौकशीनंतरच समोर येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com