भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी
लोकसभा निवडणूकीत बारामतीत सुरू झालेला पवार विरुद्ध पवार संघर्ष विधानसभेतही रंगण्याची शक्यता वर्तवली जातेय. मात्र यावेळी चर्चा सुरू झालीय ती बारामतीच्या मैदानाची नव्हे तर कर्जत-जामखेडमध्ये रंगणाऱ्या सामन्याची. विशेष म्हणजे रोहित पवारांना थेट काका अजित पवारच आव्हान देणार असल्याचा दावा दुसरा तिसरा कुणी नव्हे तर खुद्द रोहित पवारांनीच केलाय.
अजित पवार आपल्याविरोधात निवडणूक लढवण्याबाबत सर्व्हे सुरु असल्याचं रोहित पवारांचं म्हणणंय. तर प्रफुल्ल पटेलांनी रोहित पवारांच्या या दाव्याची खिल्ली उडवलीय.
लोकसभेला बारामतीत नणंद भावजय सामना रंगला होता. त्यातच विधानसभेला अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवारांना मैदानात उतरवून पवार विरुद्ध पवार संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यापार्श्वभूमीवर अजित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय. मात्र अजित पवार कर्जत जामखेडमधून निवडणूक लढण्याची शक्यता का आहे?
बारामतीच्या शेजारी असल्याने मतदारसंघात जनसंपर्क
आंबिका साखर कारखान्यामुळे शेतकऱ्यांशी संपर्क
कर्जत-जामखेडमध्ये कार्यकर्त्यांचं मोठं जाळं
बारामतीत अजित पवारांविरोधात युगेंद्र पवारांना उमेदवारी देण्याची घोषणा जयंत पाटलांनी केलीय. त्यामुळे युगेंद्र पवारांकडे राज्याचं लक्ष गेलंय. त्यापार्श्वभूमीवर अजित पवार कर्जत जामखेडमधून लढणार असल्याचा रोहित पवारांनी दावा केलाय. मात्र हा दावा आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आहे की खरंच अजित पवार कर्जत जामखेडमधून लढणार? हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.