Kalyan Accident: धावत्या मिक्सर ट्रकचं ब्रेक फेल, रस्त्यात येईल त्याला उडवले, कल्याणमध्ये भीषण अपघात

Accident: कल्याण पूर्वेतील पूर्ण लिंक रोडवर मिक्सर ट्रकचा ब्रेक फेल होऊन अपघात झाला, ज्यात टेम्पो आणि रिक्षांना धडक देत चार ते पाच जण जखमी.
धावत्या मिक्सर ट्रकचं ब्रेक फेल, रस्त्यात येईल त्याला उडवले, कल्याणमध्ये भीषण अपघात
धावत्या मिक्सर ट्रकचं ब्रेक फेल, रस्त्यात येईल त्याला उडवले, कल्याणमध्ये भीषण अपघातGoogle
Published On

कल्याण पूर्वेतील पुणे लिंक रोडवर आज सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. मिक्सर ट्रक बुडालींक रोड कडून चक्की नाक्याच्या दिशेने जात होता. याच दरम्यान, मिक्सर ट्रकचा ब्रेकफेल झाल्याने त्याचे नियंत्रण सुटले. या ट्रकने रस्त्यावरून जाणाऱ्या तीन ते चार रिक्षांना तसेच एका छोट्या टेम्पोला जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की टेम्पो आणि रिक्षांचा अक्षरशः चक्काचूर झाला. टेम्पो चालक टेम्पोमध्ये अडकून पडला होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या टेम्पो चालकाला बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात दोन रिक्षाचालकांसह दोन प्रवासी जखमी झाल्याचे समजते.

धावत्या मिक्सर ट्रकचं ब्रेक फेल, रस्त्यात येईल त्याला उडवले, कल्याणमध्ये भीषण अपघात
Mumbai Accident: मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; २ तरूणांचा जागीच मृत्यू

दरम्यान, या मिक्सर ट्रकच्या मागून येणारा आणखी एक मिक्सर ट्रक अंदाज न आल्याने पुढच्या वाहनांवर आदळला. मात्र, सुदैवाने तो थांबल्याने आणखी मोठा अनर्थ टळला. या अपघातामुळे कल्याण पूर्व पुणे लिंक रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

या घटनेनंतर कोळशेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करून पुढील तपास सुरू आहे.

Edited By - Purva Palande

धावत्या मिक्सर ट्रकचं ब्रेक फेल, रस्त्यात येईल त्याला उडवले, कल्याणमध्ये भीषण अपघात
Samruddhi Mahamarg Accident: 'समृद्धी'वरील अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ७ लाखांची मदत, जखमींवर मोफत उपचार :मुख्यमंत्री

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com