Kalyan News BJP Shiv Sena Yuti
Kalyan News BJP Shiv Sena YutiSaam tv

BJP Shivsena Yuti: युतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम करू नये; युवासेना नेत्याचे भाजपला आवाहन

युतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम करू नये; युवासेना नेत्याचे भाजपला आवाहन
Published on

अभिजित देशमुख

कल्याण : महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. त्यात कोणीही मिठाचा खडा टाकण्याचे काम करू नये; असे आवाहन (Shiv sena) शिवसेना युवा नेते दीपेश म्हात्रे यांनी नाव न घेता (BJP) भाजप नेत्यांना केलं आहे. (Breaking News)

Kalyan News BJP Shiv Sena Yuti
Nashik News: लालपरीच्‍या स्टिअरिंगवर महिला चालक; नाशिक ते सिन्नर मार्गावर चालविली बस

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत पोलीसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिस याचा तपास करतील ज्याची चूक असेल त्याच्यावर नक्कीच कारवाई होईल, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप पदाधिकाऱ्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत जोपर्यंत पोलीस अधिकाऱ्यांची बदली होत नाही. तोपर्यंत कल्याण लोकसभा क्षेत्रात शिवसेनेला सहकार्य करणार नसल्याची भूमिका भाजप पदाधिका्यांनी बैठकीत घेतली होती. तसेच विकास कामांच्या लोकार्पण भूमिपूजनाच्या कार्यक्रमात भाजप नेत्यांचे शिवसेनेकडून फोटो लावले जात नसल्याची तक्रार या बैठकीत करण्यात आली होती. त्यामुळे शिवसेना भाजपमधील धुसफूस चव्हाट्यावर आली होती. त्यावर आता शिवसेना नेते दीपेश म्हात्रे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना आवाहन केलं आहे.

Kalyan News BJP Shiv Sena Yuti
Nandurbar News: बोगस खते, बियाणे विक्री; कारवाईसाठी ठाकरे शिवसेना गटाचे धरणे आंदोलन

युती धर्म पाळतोय

भूमिपूजन लोकांर्पनाच्या कार्यक्रमांमध्ये बॅनरवर भाजप नेत्यांचे फोटो जाणीवपूर्वक लावले जात नसल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. याबाबत बोलताना युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी सांगितले, की जेव्हापासून भाजप शिवसेनेची युती आहे. विशेषतः (Kalyan) कल्याण लोकसभा क्षेत्रात प्रत्येक वेळेस युती धर्म पाळत आलोय आणि इथून पुढे देखील युतीचा धर्म पाळणार. काही लोकांनी शिवसेनेचे लोक युतीचा धर्म पाळत नाही, असा आरोप केला. मात्र प्रत्येक बॅनरमध्ये किंवा प्रत्येक कामात भाजपच्या प्रत्येक नेत्याचा मानसन्मान राखण्याचे काम शिवसैनिकांनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com