Nashik News: लालपरीच्‍या स्टिअरिंगवर महिला चालक; नाशिक ते सिन्नर मार्गावर चालविली बस

लालपरीच्‍या स्टिअरिंगवर महिला चालक; नाशिक ते सिन्नर मार्गावर चालविली बस
MSRTC Bus Nashik News
MSRTC Bus Nashik NewsSaam tv
Published On

तबरेज शेख

नाशिक : एसटी महामंडळाच्या इतिहासात एक ऐतिहासिक घटना घडली. (Nashik) नाशिक ते सिन्नर या मार्गावर प्रथमच एका महिला चालकाने एसटी महामंडळाची बस (MSRTC Bus) चालवली. माधवी साळवे या महिला चालकाने केलेली ही कामगिरी कौतुकास्पद आहे. (Tajya Batmya)

MSRTC Bus Nashik News
Kalyan News: धावत्या एक्स्प्रेसमध्ये धक्‍कादायक प्रकार; आई झोपलेली असताना दीड वर्षाची मुलगी अचानक झाली गायब

माधवी साळवे या नाशिकमधील पहिल्या एसटी महिला ड्रायव्हर ठरल्या आहेत. नाशिकमधील धुडगाव येथे राहणाऱ्या माधवी यांचा गृहिणी ते बस ड्रायव्हर असा प्रवास कौतुकास्पद आहे. एसटी महामंडळाने सन २०१९ च्या भरती प्रक्रियेत २०६ महिलांची चालक या पदावर निवड केली. या सर्व महिलांना एक वर्ष हेवी व्हेईकल चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर या महिलांनी एक वर्ष (St Bus) एसटी बस चालवण्याचा सराव केला. आता या महिलांना एसटी बसवर रीतसर रूजू करून घेण्यात आले आहे.

MSRTC Bus Nashik News
Jalgaon News: झोक्‍यातील चार महिन्‍याची बालिका पत्रांसह उडाली; वादळी वाऱ्याचा तडाखा

एसटीत महिला नसल्‍याने निवड

माधवी यांना लहानपणापासून गाड्या चालवण्याची आवड आहे. एसटी महामंडळात कुणीही महिला नसल्याने एसटीची निवड केल्याचे माधवी सांगतात. जास्तीत जास्त महिलांनी या क्षेत्रात येण्याचे आवाहन त्यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com