Kalyan News: जलवाहिनीच्या दुरुस्ती दरम्यान शॉक लागून कर्मचारी जखमी

जलवाहिनीच्या दुरुस्ती दरम्यान शॉक लागून कर्मचारी जखमी
Kalyan News Electric Shock
Kalyan News Electric ShockSaam tv

अभिजीत देशमुख

कल्याण : स्टेमच्या जलवाहिनी दुरुस्ती दरम्यान कर्मचाऱ्याला शॉक (Electric Shock) लागल्याने कर्मचारी जखमी झाल्याची घटना शहाडजवळ घडली. अर्जुन आवळे असे या कर्मचाऱ्याचे नाव असून या दुर्घटनेत कर्मचारी ५० टक्के भाजला आहे. या कर्मचाऱ्याला उपचारासाठी (Kalyan) कल्याणमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Breaking Marathi News)

Kalyan News Electric Shock
Dhule News: धुळे– नेर महामार्गावर नागरिकांचा रास्‍ता रोको; प्रशासनातर्फे स्थानिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष

कळवा, भिवंडी परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी नेहमीप्रमाणे स्टेम प्राधिकरणाकडून शुक्रवारी २४ तासाचा शटडाऊन घेण्यात आला होता. शुक्रवारपासून कल्याणजवळील शहाड परिसरात देखभाल दुरुस्ती सुरु होती. शनिवारी सकाळी ९ वाजेपर्यत दुरुस्तीचे काम केल्यानंतर पाणी पुरवठा सुरु करण्यासाठी आवळे हे शहाड येथील पंप हाउस मध्ये गेले.

Kalyan News Electric Shock
Pune Crime News: पोलिस हवालदाराचा महिलेवर अत्‍याचार; कुटुंबीयांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत धक्‍कादायक कृत्‍य

पाणी पुरवठा सुरु करताना त्यांना शॉक लागल्याने ते कोसळले. मात्र इतर कर्मचार्यांनी तातडीने त्यांना बाजूला करून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान याबाबत स्टेम प्राधिकरणाचे कल्याण विभागाचे कार्यकारी अभियंता महेश भोये यांना विचारले असता त्यांनी दुरुस्तीनंतर पाणी पुरवठा सुरु करत असताना एका कर्मचार्याला शॉक लागल्याने तो ५० टक्के भाजला असून त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com