Dhule News: धुळे– नेर महामार्गावर नागरिकांचा रास्‍ता रोको; प्रशासनातर्फे स्थानिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष

धुळे– नेर महामार्गावर नागरीकांचा रास्‍ता रोको; प्रशासनातर्फे स्थानिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष
Dhule News
Dhule NewsSaam tv
Published On

धुळे : धुळे तालुक्यातील धुळे ते नेर महामार्ग क्रमांक सहाचे काम सुरू असून या कामादरम्यान प्रशासनातर्फे मोठ्या प्रमाणात (Dhule News) त्रुटी ठेवण्यात आल्या. असा आरोप करत परिसरातील शेतकऱ्यांनी (Farmer) प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महामार्गावर रास्ता रोको केला आहे. (Tajya Batmya)

Dhule News
Shirpur News: सावकारी जाचाला कंटाळला; स्‍टेटस्‌ ठेवत तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

धुळे– नेर दरम्‍याच्‍या महामार्गावर बऱ्याच ठिकाणी सर्विस रस्ते करणे आवश्यक असताना याबाबतची मागणी देखील यापूर्वी परिसरातील नागरिकांनी केलेली आहे. परंतु या मागणीकडे संबंधित प्रशासनातर्फे सर्रासपणे डोळेझाक केली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. बहुतांश ठिकाणी जास्त लोकसंख्या असलेले गावे असताना देखील त्या ठिकाणी सर्कल करणे अपेक्षित असल्याचे म्हणत याकडे देखील प्रशासनाने दुर्लक्ष करत सर्रासपणे काम सुरू ठेवले.

Dhule News
Nandurbar News: जिल्ह्यात जलसंकट..एक हंडा पाण्यासाठी ४ किलोमीटर पायपीट

तसेच रस्ते किनारी असलेल्या शेतकऱ्यांना शेतीपासून हा महामार्ग उंचावर असल्यामुळे देखील शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात उपाययोजना करण्याच्या देखील मागण्या यापूर्वी शेतकऱ्यांतर्फे करण्यात आल्या. याकरीताच रास्तारोको आंदोलन करत यामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी त्याचबरोबर परिसरातील नागरिक सहभागी होत आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले. यावेळी प्रशासनाच्या विरोधामध्ये संबंधित आंदोलकांनी तीव्र घोषणाबाजी करून आपला संताप व्यक्त केला आहे. या रास्ता रोको दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे देखील बघायला मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com