Kalyan News : राहुल गांधी, कल्याण बॅनर्जी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन; कल्याणात भाजप आक्रमक

Kalyan News : तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनकवडे यांच्याबाबत मिमिक्री केली. त्याचा व्हिडिओ राहुल गांधी यांनी मोबाईलमध्ये केल्या
Kalyan News
Kalyan NewsSaam tv

अभिजित देशमुख

कल्याण : तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनकवडे यांच्याबाबत मिमिक्री केली. त्याचा व्हिडिओ राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आपल्या (Kalyan) मोबाईलमध्ये केल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली. या विरोधात राहुल गांधी व खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या प्रतिमेला जोडमार आंदोलन केले. (Tajya Batmya)

Kalyan News
Thane Crime: दीराकडे राहायला आली होती पत्नी आणि २ मुलं; भेटायला आलेल्या क्रूर पतीनं तिघांनाही संपवलं

तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनकवडे यांच्याबाबत मिमिक्री केली. त्याचा व्हिडिओ राहुल गांधी यांनी मोबाईलमध्ये केल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली. भाजपच्या वतीने तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी व खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलनात्मक पवित्रा घेत निषेध आंदोलन सुरू केलं आहे. कल्याण पूर्वेकडील काटेमानवली चौकात जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली भाजप माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या (Congress) उपस्थितीत कार्यकर्त्यानी तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी व खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केले. कल्याण बॅनर्जी व राहुल गांधी  यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध नोंदवण्यात आला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kalyan News
Hingoli News : मराठा आरक्षणासाठी उच्चशिक्षित तरुणाने संपविले जीवन; हिंगोलीतील घटना

यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी ज्यांनी या देशाकरीता योगदान दिलंय त्यांचा अवमान करणे हा तृणमूल काँग्रेस व काँग्रेसचा इतिहास आहे. त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा दिसून आला. देशाचे उपराष्ट्रपतींची नक्कल करून त्यांचा अवमान करण्यात आला. याची राहुल गांधी हे शूटिंग करतात अशा प्रकारचा अवमान करणं हे अत्यंत गैर आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेससह काँग्रेसचे नेत्यांचा आम्ही निषेध करत आहोत असे सांगितले. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com