Kalyan News: प्रवासी तरुणीचा विनयभंग; कॅबचालक पोलिसांच्या ताब्यात

Kalyan News : कॅबचालकाकडूनच प्रवासी तरुणीचा विनयभंग; नवी मुंबई- कल्याण दरम्यानची घटना
Kalyan News
Kalyan NewsSaam tv
Published On: 

अभिजित देशमुख

कल्याण : नवी मुंबईहून कल्याणच्या दिशेने रात्रीच्या सुमारास  कॅबने प्रवास करणाऱ्या एका तरुणीचा (Kalyan) कॅब चालकाने विनयभंग केला. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून कोळशेवाडी पोलिसांनी कॅबचालक राकेश जयस्वाल याला नवी मुंबई ऐरोली येथून ताब्यात घेतले आहे. (Latest Marathi News)

Kalyan News
Ahmednagar News: विविध कंपन्यांच्या ३० दुचाकी जप्त; तीन आरोपींना ठोकल्या बेड्या

नवी मुंबई परिसरात एका कंपनीमध्ये काम करणारी तरुणी तीन दिवसांपूर्वी काम आटोपल्यानंतर रात्रीच्या सुमारास घराच्या दिशेने निघाली होती. कल्याण येथे येण्यासाठी तिने नवी मुंबई येथून कॅब बुक केली. या कॅबने प्रवास करत असताना कॅब चालकाने पीडित तरुणीचा विनयभंग केला. (Crime) पीडितेने आरडा ओरड करताच कॅब चालकाने कल्याण सूचक नाका परिसरात तरुणीला खाली उतरवून तेथून पळून गेला. 

Kalyan News
Beed News : ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या; केजमध्ये रिपाईचा विराट मोर्चा

कॅब चालकास अटक 

घटनेमुळे रात्री अपरात्री कॅबने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. पिडीतेने घडल्या प्रकाराबाबत कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत या कॅब चालकाचा शोध सुरू केला. अखेर पोलिसांनी नवी मुंबई ऐरोली येथून राकेश जयस्वाल या कॅब चालकाला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com