KDMC School
KDMC SchoolSaam tv

KDMC School : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी केडीएमसीचा मोठा निर्णय; ६१ शाळांमध्ये बसविले सीसीटीव्ही कॅमेरे

Kalyan News : केडीएमसीच्या ६१ शाळांमध्ये देखील सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा सूचना केल्या होत्या. सहा ते सात महिन्याच्या काळात महापालिकेतील ६१ शाळांमध्ये ५०२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले
Published on

अभिजित देशमुख 
कल्याण
: मुलींवरील अत्याचाऱ्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. शाळांमध्ये या घटना घडल्या आहेत. यामुळे शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कल्याण- डोंबिवली महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. केडीएमसी अंतर्गत असलेल्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. यात साधारण ६१ शाळांमध्ये ५०२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.  

बदलापूर येथील एका शाळेत चिमुकल्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. त्या घटनेनंतर राज्य शासनाने विद्यार्थ्यांचे सुरक्षिततेबाबत ठोस पावले उचलली. राज्यातील सर्व शासकीय, खासगी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश शाळा प्रशासनाना दिले होते. या पार्श्वभूमीवर केडीएमसी आयुक्त इंदूराणी जाखड यांनी महापालिका हद्दीतील सर्व शाळांना सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचे आदेश दिले होते.

KDMC School
Fraud Case : गुंतवणूक करण्याचे सांगत कोट्यवधी रुपयांची फसवणूक; दोन जण पोलिसांच्या ताब्यात

मुख्याध्यापकांच्या दालनात नियंत्रण कक्ष 

आयुक्तांच्या आदेशानुसार केडीएमसीच्या ६१ शाळांमध्ये देखील सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा सूचना केल्या होत्या. सहा ते सात महिन्याच्या काळात महापालिकेतील ६१ शाळांमध्ये ५०२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे आता शाळेतील हालचालींवर तिसऱ्या डोळ्याची नजर राहणार आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे नियंत्रण कक्ष मुख्याध्यापकांच्या दालनात आहे. 

KDMC School
Nandurbar : घरासमोरील रस्त्यावर घातले तार कंपाउंड; मालकी हक्क दाखवत कुटुंबीयांचा रस्ताच केला बंद

नियमित होणार फुटेज तपासणी 

केडीएमसी आयुक्त इंदुराणी जाखड यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या 61 शाळांमध्ये हे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेराद्वारे शाळा सुरू झाल्यापासून ते शाळा सुटेपर्यंत होत असलेल्या हालचालींवर या कॅमेराच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार आहे. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी देखील नियमितपणे केली जाणार असल्याची माहिती केडीएमसी अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com