Kalyan News: मध्‍यरात्रीनंतर रस्‍त्‍यावर उच्चशिक्षित तरुणांचा दारू पिवून धिंगाणा

मध्‍यरात्रीनंतर रस्‍त्‍यावर उच्चशिक्षित तरुणांचा दारू पिवून धिंगाणा
Kalyan News
Kalyan NewsSaam tv
Published On: 

अभिजीत देशमुख

कल्‍याण : पहाटे अडीच वाजता भरधाव वेगाने गाडी चालवत गाडीमध्ये मोठ मोठ्याने गाणे लावत धिंगाणा घालणाऱ्या चार तरुणांना बाजारपेठ (Police) पोलिसांनी अटक केली. कल्याण पश्चिम रेतीबंदर (Kalyan News) परिसरात ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जात परिस्थितीत नियंत्रणात आणली. (Maharashtra News)

Kalyan News
Nagpur ZP News: जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाअध्यक्ष, सभापतींसह सदस्य बसले आंदोलनाला; नुकसान भरपाईची मागणी

कल्याणमध्ये अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला. कल्याण रेतीबंदर परिसरात रात्री पावणे तीन वाजण्याच्या सुमारास एका चार चाकी गाडीत काही तरुण आले. त्यांनी घोषणबाजी सुरू केली. गाडीमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावली होती. तरुणांचे हे कृत्य पाहून परिसरात गोंधळ उडाला. परिसरात पहाटे दुकान लागतात. हा गोंधळ पाहून व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. चौघे तरुण दारूच्या नशेत होते.

Kalyan News
Jalgaon Crime: १५ टरबुज उत्पादक शेतकऱ्यांची ३५ लाखात फसवणूक

तरुणांना घेतले ताब्यात

याबाबत बाजारपेठ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तरुणांना ताब्यात घेतले. तुषार गाढवे, नितीन भोंडिवले, आकाश सानप, प्रथम पवार अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. विशेष म्हणजे हे चारही तरुण उच्च शिक्षित आहेत. या चार तरुणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. पोलीस वेळेवर पोहोचले म्हणून मोठा अनर्थ टळला. अन्यथा या ठिकाणी मोठा वाद झाला असता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.