Nagpur ZP News: जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाअध्यक्ष, सभापतींसह सदस्य बसले आंदोलनाला; नुकसान भरपाईची मागणी

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाअध्यक्ष, सभापतींसह सदस्य बसले आंदोलनाला; नुकसान भरपाईची मागणी
Nagpur Zp
Nagpur ZpSaam tv

नागपूर : मागच्या एक महिन्यात झालेल्या अवकाळीच्या नुकसान भरपाईमध्ये नागपूर जिल्ह्यातील (Farmer) शेतकऱ्यांना वगळण्यात आल्‍याचा आरोप जिल्‍हा परिषदेतील सत्‍ताधाऱ्यांनी केला आहे. यामुळे नागपूरच्या (Nagpur) जिल्हाधिकारी कार्यलयासमोर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य आंदोलनाला बसले आहेत. (Live Marathi News)

Nagpur Zp
Nandurbar News: आदिवासी मजुरांची पिळवणूक; काम करूनही हजेरी कमी लावण्याचा प्रकार, बीडमध्‍ये अडकले ४० मजुर

नागपूरच्‍या जिल्‍हा परिषदेस कॉंग्रेसची सत्‍ता आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात राज्य सरकारने नागपूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले होते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अवकाळीचा नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागले; असा आरोप नागपूर (Zilha Parishad) जिल्‍हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्यांनी करत हे आंदोलन केले.

Nagpur Zp
Pankaja Munde: राजकारणाचे व्यासपीठ धर्माच्या लोकांनी व्यापलं; पंकजा मुंडे यांचा महंतांना टोला

उपमुख्‍यमंत्र्यांचा जिल्‍हा तरीही..

नागपूर जिल्हा हा उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा गृह जिल्हा आहे. नागपूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे सुमारे साडेचार हजार हेक्टरवरील जिरायती व बागायती, बागा, पालेभाज्या पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास शासन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत आंदोलन करण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com