Nandurbar News: आदिवासी मजुरांची पिळवणूक; काम करूनही हजेरी कमी लावण्याचा प्रकार, बीडमध्‍ये अडकले ४० मजुर

आदिवासी मजुरांची होतेय पिळवणूक; काम करूनही हजेरी कमी लावण्याचा प्रकार, बीडमध्‍ये अडकले ४० मजुर
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदूरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील राडीकलम, घाटली खामला, बोदला, मांडवी, वलवाल येथील रहिवासी (Nandurbar) असलेल्या 40 आदिवासी कामगारांची तुकडी बीड (Beed) जिल्ह्यातील वाघोरा (ता.माझलगाव) येथे गेले आहेत. एका खाजगी प्रोडक्ट आणि ऑईल कंपनीच्या ठेकेदारांनी ठरल्याप्रमाणे मजुरांना मजुरी न देता कमी मजुरी आणि दैनंदिन हजेरी कमी दाखवून दोन शिप्टच्या ड्युटीची नोंद न करता मजुरांची पिळवणूक करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. (Breaking Marathi News)

Nandurbar News
Beed News: नात्‍यातील मुलगा घरी आला अन्‌ केले घृणास्‍पद कृत्‍य; पीडिता दोन महिन्याची गर्भवती

मजुरांचे पिळवणूक करण्याचा प्रकार हा नवीन नसून अनेक वेळा असा अमानुषातेचा प्रकार समोर आला आहे. मागील महिन्यातच धडगाव तालुक्यातील भमाणा येथील उसतोड मजुरांना डांबून ठेवल्याचा प्रकरण ताजे असतानाच हे प्रकरण समोर आले आहे. अश्या घटनांच्या बाबतीत बाबतीत जिल्हा प्रशासनाच्यावतीने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. मजुरावर अमानुषवागणूक देणाऱ्यावर गुन्हा नोंदविण्यात यावा आणि कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

Nandurbar News
Jalgaon News: पोलिस होण्याचे स्‍वप्‍न अधुरे; भरती प्रक्रिया करून परतताना मृत्यूने गाठले

ठरल्याप्रमाणे मजुरी मिळावी आणि तेथून सुटका व्हावी; यासाठी मजूर तालुका प्रशासनाला विनंती करत असल्याचा व्हिडीओ हाती आला आहे. मागील चार महिन्यांपूर्वी मजूर कामासाठी राडीकलम, घाटली खामला बोदला मांडवी वलवाल गावातून बीड जिल्ह्यातील माझलगाव तालुका येथील वाघोरा येथे गेले होते. तुकाराम शिंदे, कदम आणि कवठेकर या तीन ठेकेदारांकडे चार महिन्यापासून कामे केली. त्याचे १ महिन्याची मजुरी देखील मिळाली. नंतरच्या ३ महिन्याची मजुरी दिलीच नाही.

Nandurbar News
Fraud Case: केळी व्यापाऱ्याची सात लाखांत फसवणूक; एका ट्रकचा सौदा करत दोन ट्रक केले परस्पर नावावर

मजुरी देण्यास टाळाटाळ

कंपनीचे काम बंद झाल्याने गावाकडे घरी येण्यासाठी मजुरांनी ठेकेदाराकडे मजुरीची मागणी केली असता आज देऊ उद्या देऊ असे विविध कारण सांगण्यात येत आहेत. तसेच आता खाजगी प्रोडक्ट आणि ओईल कंपनीच्या ठेकेदारांनी ठरल्याप्रमाणे ४०० रुपये न देता ३५० रूपये मजुरी देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कमी मजुरी आणि त्यातल्या त्यात दैनंदिन हजेरी कमी नोंदवून ठेवली असल्याचे मजूर सांगत आहे. तसेच मजुरांनी केलेल्या दोन शिप्टच्या ड्युटीची नोंदच केली नाही. अश्या पद्धतीने कामे करून घेतल्यानंतर मजुरांची चौफेर पिळवणूक होत आहेत. हातात पैसे नसल्याने जेवणाला देखील धान्य नाही. शिधा संपल्याने उपासमारीची वेळ आली आहे. आमच्या मजुरीचे पैसे मिळवून आमची सुटका करा;वी अशी विनवणी करत आहे. यात लहान मुलांचा आणि महिलांचा देखील समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com