Kalyan News : मध्य प्रदेशातून सहा महिन्याच्या बाळाचे अपहरण; २९ लाखात झाला होता सौदा, कल्याणमधून सहा आरोपीना अटक

Kalyan News : मध्य प्रदेश येथील रिवा जिल्ह्यातील सीव्हल लाईन परिसरात रस्त्यावर झोपलेल्या फेरीवाला दाम्पत्याच्या सहा महिन्याच्या बाळाचे अपहरण झाले होते.
Kalyan News
Kalyan NewsSaam tv

अभिजित देशमुख

कल्याण : मध्य प्रदेशमधून अपहरण झालेल्या सहा महिन्यांच्या बाळाची कल्याण खडकपाडा पोलिसांनी मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने अवघ्या आठ तासात सुटका केली. या प्रकरणात (Kalyan) कल्याण पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे शिक्षक दाम्पत्याला मुलं होत नसल्याने त्यांना बाळ हवे असल्याने २९ लाखात बाळाचा सौदा केला असल्याची माहिती समोर आलो आहे.

Kalyan News
Nashik News : बारागाड्या ओढताना ५ जण जखमी; अक्षय तृतीयेला यात्रोत्सव समारोपावेळी अपघात

मध्य प्रदेश (Madhya Pradesh) येथील रिवा जिल्ह्यातील सीव्हल लाईन परिसरात रस्त्यावर झोपलेल्या फेरीवाला दाम्पत्याच्या सहा महिन्याच्या बाळाचे अपहरण झाले होते. फेरीवाला दाम्पत्य फुटपाथवर झोपले असताना दोन बाईकस्वारानी (Crime News) सहा महिन्याच्या बाळाला उलचून पळ काढला होता. बाळाच्या रडण्याचा आवाज आल्याने ते दाम्पत्य उठले. त्यांनी दुचाकीचा पाठलाग केला. मात्र दुचाकीस्वार पसार होण्यात यशस्वी झाले होते. या प्रकरणाची तक्रार सीव्हील लाईन पोलिस ठाण्यात केली. (Police) पोलिसांनी त्वरीत सीसीटीव्हीच्या सहाय्याने बाळाच्या अपहरण करणाऱ्यांना ताब्यात घेतले. 

Kalyan News
Lightning Strike : वीज अंगावर कोसळून तरुणाचा मृत्यू; सासरी गेला असताना घडली घटना

तपासा दरम्यान सहा महिन्याचे बाळ महाराष्ट्रात गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस तपासा दरम्यान अपहरणकर्त्यांनी नितीन साेनी आणि स्वाती सोनी उर्फ मेहक खान या दाम्पत्याचे नाव सांगितले. सोनी दाम्पत्य कल्याणला राहत असल्याची माहिती मध्य प्रदेश पोलिसांना मिळाली. त्यांनी कल्याण पोलिसांशी संपर्क साधत माहिती दिली. यानंतर कल्याण खडपड पोलिसांनी बाळाचा शोध सुरू केला. मध्य प्रदेश पोलिस देखील कल्याणला पोहचले. पोलीस अधिकारी शिवले, अनिल गायकवाड, ठोके, पोलीस कर्मचारी बुधकर यांच्या पथकाने नितीन आणि स्वाती सोनी या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी हे बाळ शेजारी राहणारे रिक्षा चालक प्रदीप कोळंबेला देण्यात आल्याचे सांगितले. पोलिसांनी प्रदीप कोळंबेला ताब्यात घेतले. प्रदीपने सांगितले की, हे बाळ अमोल येरुणकर आणि त्याची पत्नी अर्वी येरुणकरला देण्यात आले आहे. पोलिसांनी येरुणकर पती पत्नीला ताब्यात घेतले. त्यांनी सांगितले की, बाळ रायगड येथील पोलादपूरमध्ये राहणारे शिक्षक श्रीकृ़ष्ण पाटील यांना दिले आहे. पोलिसांनी पनवेल येथून शिक्षक पाटील याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळ असलेल्या बाळाची सुटका केली. 

शिक्षकाने माजी विद्यार्थ्यांशी केला व्यवहार 

रायगड येथील पोलादपूरमध्ये राहणारे शिक्षक पाटील यांना वयाच्या ५३ वर्षापर्यंत मुल झाले नव्हते. त्यांना बाळा पाहिजे असल्याने ते बाळाच्या शोधात होते. त्यांनी एकेकाळी त्यांचा विद्यार्थी असलेला अमोल येरुणकरला काय पण करुन एक बाळ घेऊन दे ते बाळ सहा ते सात महिन्याचे हवे असे सांगितले. अमोल हा मुंबईतील एका नामांकित रुग्णलायात अटेंण्डट असल्याचे त्यांना माहीत होते. बाळ देतो असे आश्वासन अमोल याने शिक्षक पाटील यांना दिले होते. त्यासाठी अमोलने पाटील यांच्याकडून २९ लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर बाळ काही मिळत नव्हते. अमोल यांनी शेअर बाजारात काम करणारी त्यांची पत्नी अर्वीला सांगितले. अर्वी दरराेज ज्या रिक्षाने प्रवास करीत होती. त्या रिक्षा वाल्यास एक बाळाची गरज आहे असे सांगत त्याबदल्यात भरपूर पैसे मिळतील असे सांगितले. रिक्षा चालकाने त्यांच्या शेजारी राहणाऱ्या सोनी दांपत्यास पैशाचे आमिष दाखवून एक बाळ उपलब्ध करुन द्या असे सांगितले. सोनी दांपत्य हे मध्य प्रदेशचे असल्याने त्याने रिक्षा चालकासोबत मध्य प्रदेशात जाऊन रेकी केली. बाळाच्या अपहरणाचा कट रचला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com