Kalyan News : नदीवर पोहायला जाणे जीवावर बेतले; १४ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

कल्याणच्या पावशेपाडा येथे उल्हास नदीमध्ये सेंच्युरी हायस्कूलचा विद्यार्थी पोहण्यासाठी गेला असता त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Kalyan news
Kalyan news saam tv
Published On

कल्याण : कल्याणच्या म्हारळ पोलीस चौकीतून धक्कादायक वृत समोर येत आहे. कल्याणच्या पावशेपाडा येथे उल्हास नदीमध्ये (Ulhas River) सेंच्युरी हायस्कूलचा विद्यार्थी पोहण्यासाठी गेला असता त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी ११ च्या दरम्यान ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Kalyan news
Ravindra chavan |नितीन गडकरी यांनी पैसे दिले, पण...; सार्वजनिक बांधकाम मंत्री स्पष्टच बोलले

मिळालेल्या माहितीनुसार, धोबीघाट येथे राहणारा सूर्यदेव संतराज यादव (14 )हा त्याचा वर्गमित्र आयर्न शर्मा याच्याबरोबर हे शाळेत जात असल्याचे सांगून थेट उल्हास नदीत पोहण्यासाठी गेले. सेंच्युरी हायस्कूलचे विद्यार्थी असलेले दोघेही मित्र पावशेपाडा येथील उल्हासनदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेले होते.

दोघेही उल्हास नदीच्या पात्राजवळ गेल्यावर सूर्यदेव हा नदीच्या पात्रात उतरला. मात्र, त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्यात उतरातच पाण्याच अंदाज न आल्याने वाहून जाऊ लागला. मित्र वाहून जात आहे, पाहिल्यानंतर त्याचा मित्र शर्माने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याला यश आले नाही.

Kalyan news
Aurangabad News : पैठणमध्ये बैलपोळा फोडण्यावरून दोन गटात हाणामारी; VIDEO व्हायरल

घाबरलेल्या आयर्न शर्माने सूर्यदेवला वाचविण्यासाठी बराच आरडाओरडा केला. परंतु सदर परिसर निर्जन असल्यामुळे कोणीच मदतीला आले नाही. त्यामुले आर्यन हा तसाच धावत म्हारळ पोलीस चौकीत गेला. घडलेला सारा प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी आणि समाजसेवक विवेक गंभीरराव यांनी घटनास्थळी जाऊन स्थानिकांच्या मदतीने शोधण्याचा प्रयत्न केला.

मात्र, दुपारी २ वाजताच्या दरम्यान, सूर्यदेवचा मृतदेह नदीच्या पात्रातून बाहेर काढण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास टिटवाळा पोलीस करत आहेत. या घटनेने मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com