

अभिजीत देशमुख
Kalyan News : तृतीयपंथीयांना त्यांच्यातील गुणांना सहकार्य आणि आर्थिक मदतीचा हात देत समाजाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देश किन्नर अस्मिता असोसीएशनचा आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय तृतीयपंथीय दिवसाचे औचित्य साधून किन्नर अस्मिता असोसीएशनने कल्याणातील खडकपाडा परिसरात तृतीयपंथीयासाठी पहिले अद्ययावत पार्लर सुरु केले. यासाठी युएस एजन्सी फॉर इंटरनशनल डेव्हलपमेंट संस्थेने आर्थिक मदत केली. (Latest Marathi News)
अमेरिकेचे महावाणिज्यदूत माईक हॅन्की आणि युएसएआयडीच्या उप मिशन डायरेक्टर कॅरेन क्लीमोव्स्की यांच्या हस्ते या सलूनचे उद्घाटन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मदतीतून उभारण्यात तृतीयपंथीयांनी तृतीयपंथीयासाठी उभारलेले ठाणे जिल्ह्यातील हे पहिले व राज्यातील दुसरे सलून ठरले आहे.
तृतीयपंथीयाना ब्युटी पार्लरमध्ये अपमानकारक वागणूक आणि ग्राहक असून प्रवेश नाकारला जायचा. या भेदभावामुळे दुखावलेल्या तृतीयपंथीयासाठी हक्काचे ब्युटी पार्लर असावे या उद्देशाने हे पार्लर सुरु करण्यात आल्याचे किन्नर गुरु नीता केणे यांनी सांगितले.
ठाणे (Thane) जिल्ह्यात जवळपास १५०० ते १६०० तृतीयपंथीय राहत असून भीक मागून हे तृतीयपंथीय आपली उपजीविका करतात. मात्र त्यांना समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी मागील २५ वर्षापासून किन्नर अस्मिता असोसीएशन काम करते. या संस्थेकडून तृतीय पंथीयासाठी शेल्टर होम सुरु करण्यात आले असून कम्युनिटी किचनच्या माध्यमातून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.