Kalyan Crime: कल्याणमध्ये तलवारबाजांची दहशत! भर रस्त्यात तरुणावर हल्ला, घटना CCTVत कैद

Kalyan Crime: ल्याण पूर्व सूचक नाका परिसरात आता भरस्त्यात दिवसा ढवळ्या तलवार घेऊन एक तरुण फिरत असल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Kalyan News
Kalyan Newssaam tv
Published On

>> अभिजित देशमुख

Kalyan News : कल्याण पूर्वमध्ये तलवार बाज तरुणांची दहशत सर्वत्र पसरली आहे. दोन दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या कल्याण नांदिवली परिसरात या टोळीने दोन तरुणांवर फिल्मी स्टाईल तलवारीने हल्ला केला होता. याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अशून तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

Kalyan News
EXPLAINER: शरद पवारांच्या राजीनाम्याचा महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणावर काय परिणाम होणार?

या घटनेनंतर आता कल्याण पूर्व सूचक नाका परिसरात आता भरस्त्यात दिवसा ढवळ्या तलवार घेऊन एक तरुण फिरत असल्याचा सीसीटिव्ही व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नसीम शेख ऊर्फ बाबू जंगली असे या तरुणाचे नाव असून त्याची या परिसरात दहशत आहे. त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. याच बाबू जंगलीवर जुन्या वादातून काल रात्रीचा सुमारास तीन जणांनी तलवार आणि लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना घडली. (Kalyan News)

Kalyan News
Mumbai Crime News: माजी नगरसेवकावर अत्याचाराचा गुन्हा; राजकीय वर्तुळात खळबळ

याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान या तलवारबाज तरुणांकडून दिवसाढवळ्या भर रस्त्यात होणारे राडे पाहून कल्याण पूर्व परिसरात दहशतीचं वातावरण आहे. त्यामुळे पोलिसांनी दहशत पसरवणाऱ्या तलवारबाज तरुणांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com