Kalicharan Maharaj News Highlights: कालीचरण महाराजांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

कालीचरण महाराजांनी रायपूर येथे आयोजित धर्मसंसद मध्ये महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. संपूर्ण देशात याचे पडसाद उमटले. दरम्यान राजकीय-सामाजिक क्षेत्रातून निषेध नोंदविला जात आहे.
Kalicharan Maharaj
Kalicharan Maharaj Saam TV
Published On

अकोला : अकोल्यातील मूळ रहिवासी असलेल्या कालीचरण महाराजांनी रायपूर येथे आयोजित धर्मसंसद मध्ये महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. संपूर्ण देशात याचे पडसाद उमटले. दरम्यान राजकीय-सामाजिक क्षेत्रातून निषेध नोंदविला जात आहे. अकोल्यात काँग्रेसच्या (Congress) आंदोलनानंतर कालीचरण बाबावर कोतवाली पोलिसांनी भांदवीच्या कलम 294 आणि 505(2) अंतर्गत गुन्हा नोंदवला होता.

Kalicharan Maharaj
Beed : वक्फ बोर्डची 405 एकर जमीन हडपल्या प्रकरणी चौथा गुन्हा दाखल

दरम्यान या प्रकरणी कालीचरण महाराजाच्या (Kalicharan Maharaj) वतीने अकोला जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. जामीन अर्जावरील सुनावणी न्यायालयात पार पडल्यानंतर या प्रकरणी न्यायालयाने कालीचरण महाराज यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन (Bail) अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे कालीचरण महाराजाच्या अडचणीत वाढ झाली आहे. तर याप्रकरणाची पुढील सुनावणी आता 1 जानेवारी रोजी होणार आहे.

हे देखील पहा -

अकोल्यात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात कालीचरण महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार अर्ज दिला होता. मात्र, पोलिसांनी तक्रार घेण्यास इन्कार केल्याने पदाधिकाऱ्यांनी ठाण्यासमोरच ठिय्या दिल्यानंतर अखेर साडे चार तासानंतर पोलिसांनी या अर्जाची दाखल घेऊन कालीचरण महाराजांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com