Kagal Vidhan Sabha : संजय मंडलिक मुश्रीफांच्या पाठिशी, घाटगे एकाकी; विधानसभेत घाटगेंचा मुश्रीफांविरोधात शड्डू?

Mahaharshtra Assembly Election : आमदारकीसाठी शड्डू ठोकलेल्या समरजित घाटगेंना कागलमध्ये एकाकी झुंज द्यावी लागणार अशी चिन्ह आहेत. कारण माजी खासदार संजय मंडलिकांनीही पाठिंबा दिल्यानं हसन मुश्रीफ यांचं पारडं जड झालं आहे.
Kagal Vidhan Sabha
Kagal Vidhan SabhaSaam Digital
Published On

आमदारकीसाठी शड्डू ठोकलेल्या समरजित घाटगेंना कागलमध्ये एकाकी झुंज द्यावी लागणार अशी चिन्ह आहेत. कारण माजी खासदार संजय मंडलिकांनीही पाठिंबा दिल्यानं हसन मुश्रीफ यांचं पारडं जड झालंय. त्यामुळे भाजप नेते समरजित घाटगे एकला चलोच्या भूमिकेत असणार की तुतारी हाती घेणार याची उत्सुकता आहे. पाहूया एक रिपोर्ट..

कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभेचं रण जिंकण्यासाठी कंबर कसलेल्या भाजप नेते समरजिसिंह घाटगे यांच्या समोरीतील अडचणी वाढत चालल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कागलमधून मंत्री हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे फडणवीसांचे निकटवर्तीय असलेले समरजितसिंह घाटगे कोणती राजकीय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. पहिल्यांदा माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी कागलमधून माघार घेत मुश्रीफांना जाहीर पाठिंबा दिला. आता माजी खासदार संजय मंडलिक यांनी सुद्धा मुश्रीफ यांच्या एका कार्यक्रमात हजेरी लावून त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत.

लोकसभा निवडणुकीमध्ये संजय मंडलिक यांना हसन मुश्रीफ आणि घाटगे गटाकडून अपेक्षित मदत झाली नसल्याचा आरोप होत होता. त्यामुळे विधानसभेला मंडलिक कोणती भूमिका याबाबत उत्सुकता होती. मात्र आता त्यांनी पाठिंबा दिल्यानं हसन मुश्रीफ यांचं कागलसाठी पारडं आणखी मजबूत झालं आहे.

Kagal Vidhan Sabha
MLA Sanjay Gaikwad : शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांचा प्रताप; वाढदिवसाचा केक तलवारीने कापला अन् तलवारीनेच सगळ्यांना भरवला

दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून समरजित घाटगे यांना चुचकारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी तुतारी चिन्हावर लढण्यासाठी गळ घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये समरजित एकला चलो रे भूमिका घेऊन अपक्ष लढणार की हातात तुतारी घेणार ? याकडे कोल्हापूरकरांचं लक्ष आहे.

Kagal Vidhan Sabha
8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! आठवा वेतन आयोग लागू होणार?, पेन्शनधारकांनाही मिळणार मोठा लाभ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com