Chandrashekhar Bawankule: 'विरोधात बातम्या न देण्यासाठी पत्रकारांना ढाब्यावर न्या...' बावनकुळेंचा पदाधिकाऱ्यांना सल्ला, ऑडिओ क्लिप व्हायरल

Ahmednagar News: पत्रकारांना निर्भिडपणे काम करु द्यायचे नाही हे भाजपाचे धोरणच आहे... अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSaam Tv

सुशिल थोरात, प्रतिनिधी

Maharashtra Politics News:

आगामी निवडणूकांच्या दृष्टीने सर्वांनी मोर्चेबांधणी सुरू केली असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. विरोधात बातम्या न देण्यासाठी पत्रकारांना ढाब्यावर न्या.. असा सल्ला पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी दिला. याबाबतची एक कथित ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे.

Chandrashekhar Bawankule
Amravati Accident: मद्यधुंद दुचाकीस्वाराची पोलिसांच्या दुचाकीला धडक; ८ महिन्यांच्या गर्भवती पोलिसाचा मृत्यू

याबाबत सविस्तर माहिती अशी की, याबाबत अधिक माहिती अशी की, आगामी निवडणूकांच्या दृष्टीने भाजपने कंबर कसली असून पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेठी सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत रविवारी अहमदनगर (Ahmednagar) शहरातील सावडी येथे महाविजय २०२४ विधानसभा पदाधिकारी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी २०२४ पर्यंत पत्रकारांनी आपल्याविरोधात एकही बातमी छापू नये यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, त्यांना चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला असे म्हणत त्यांना ढाब्यावरही घेऊन जा, असा सल्ला पदाधिकाऱ्यांना दिला.

सुप्रिया सुळे आक्रमक...

बावनकुळे यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. "विरोधी आवाज हे लोकशाहीचे मुलभूत सौंदर्य आहे. परंतु भाजपाला हे मान्य नाही‌.." अशा शब्दात त्यांनी या विधानावरुन संताप व्यक्त केला आहे.

तसेच "पत्रकारांना निर्भिडपणे काम करु द्यायचे नाही हे भाजपाचे धोरणच आहे, भाजपाने (BJP) एकतर उघडपणे त्यांना लोकशाही व्यवस्था मान्य नाही हे सांगावे अन्यथा अशी बेजबाबदार विधाने केल्याबद्दल पत्रकारांची आणि जनतेची माफी मागावी‌..." अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी बावनकुळे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. (Latest Marathi News)

Chandrashekhar Bawankule
Political News : महाजनांच्या हातपाय जोडण्याच्या टीकेवर एकनाथ खडसेंचे प्रत्युत्तर, सत्तेसाठी कोणाचीही...

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनीही साधला निशाणा....

"चंद्रशेखर बावनकुळे जी, तुम्ही राज्यातील पत्रकारांना काय चिरीमिरी घेणारे समजताय का? देशातील १२ पत्रकार विकले गेले म्हणून सगळे पत्रकार स्वतःचा इमान विकतील असं नाही. दुसऱ्यांचे पक्ष फोडून, इडी सीबीआय सारख्या संस्थांचा धाक दाखवून ही भाजप विरुद्ध आवाज दबत नाही आहे. त्यामुळे दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत तुमच्या पक्षातील सर्व नेत्यांची आणि अंधभक्तांची वाढलेली अस्वस्थता आम्ही समजू शकतो.. अशा शब्दात बावनकुळेंवर टीका केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com