

jitendra Awhad News: अजित पवार आणि त्यांचे समर्थक शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवारांच्या भूमिकेनंतर राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून पक्षाच्या कार्यालयावर दावा केला जात आहे. याचदरम्यान, 'शिंदे गटाच्या बंडानंतर 24 तासात अजित पवारांसह आमदार भाजपसोबत जाणार होते, त्याला जयंत पाटील यांनी विरोध केला, असा खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. (Latest Marathi News)
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला. जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी अजित पवार गटाने शरद पवार यांचे फोटो वापरू नये यावर भाष्य केले. 'शरद पवार जिवंत आहे ना...त्यांनी सांगितले की, माझे फोटो वापरू नका, मग त्यांचे फोटो कसे वापरता? शरद पवार यांचे विचार पटत नाही, तर फोटो का चालतो? असा सवाल आव्हाड यांनी केला.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे आमदार कोणता निर्णय घेण्याचा तयाारीत होते, याविषयी भाष्य केलं. आव्हाड म्हणाले,'एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीने चोवीस तासांत भाजपला पाठिंबा द्यावा, अशा प्रस्तावाचे पत्र तयार केले होते. त्यावर अजित पवार यांच्यासहित अनेक आमदारांनी सह्या केल्या होत्या. मात्र, ते पत्र जयंत पाटील यांनी शरद पवारांना दिलेच नाही. शरद पवारांना एकटे कसे सोडायचे म्हणून जयंत पाटील यांनी पत्र दिले नाही'. शरद पवारांना एकटे सोडण्यावरून जयंत पाटील रडल्याचेही आव्हाड यांनी सांगितले.
'ज्या बैठकीत पत्रावर सह्या घेतल्या. त्या बैठकीत आमदार दिलीप बनकर यांनी भूमिका मांडली होती की, शरद पवार यांचे वय झाले, त्यांना राहू द्या. आपण भाजपला पांठिबा देऊयात', असा दावा आव्हाड यांनी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.