Jayant Patil Vs Rohit Pawar : राष्ट्रवादीत 'सेनापती'वरुन जुंपली?; जयंत पाटील-रोहित पवारांमध्ये धुसफूस?

Maharashtra Politics 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजीला सुरू झाल्याची चर्चा आहे. पक्षाच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यातल्या जाहीर भाषणात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार यांच्यामध्ये विजयाच्या श्रेयावहरून जुंपली.
Jayant Patil Vs Rohit Pawar
Jayant Patil Vs Rohit Pawar Saam Digital
Published On

तन्मय टिल्लू, साम टीव्ही प्रतिनिधी

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजीला सुरू झाल्याची चर्चा आहे. पक्षाच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यातल्या जाहीर भाषणात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार यांच्यामध्ये विजयाच्या श्रेयावहरून जुंपली. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा वाद वाढणार की शमणार यावरचा हा विशेष रिपोर्ट.....

लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 पैकी 8 जागांवर यश मिळालं. मात्र या यशावरून राष्ट्रवादीच्या रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनाच्या सोहळ्यालाच पक्षातला अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. याला कारण ठरलं ते पुण्यात सेनापती म्हणून जयंत पाटलांचे लागलेले बॅनर्स. या बॅनरवरून वर्धापन दिनाच्या जाहीर भाषणात रोहित पवारांनी जयंत पाटलांचं नाव न घेता समाचार घेतला. हे यश कुणा एका सेनापतीचं नव्हे तर सर्व कार्यकर्त्यांचं असल्याचा टोला हाणला. तर जयंत पाटलांनीही आपल्या भाषणातच रोहित पवारांना कानपिचक्या देत जाहीरपणे तक्रारी न मांडण्याचा खोचक सल्ला दिला.

पक्ष कोणा एकाची संपत्ती नाही, असं रोहीत पवारांनी म्हटलं आहे. तर चुकत असेल तर कानात सांगा, जाहीररित्या बोलणं टाळा असं जयतं पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, रोहित पवार आणि जयंत पाटलांमध्ये श्रेयवादावरुन जुंपली असतानाच दोघांचेही कार्यकर्ते सोशल मीडियावर आपापसात भिडल्याचं दिसतंय.

Jayant Patil Vs Rohit Pawar
Maharashtra Politics 2024: महायुतीतून लढणार, 20 जागा मिळणार?; मनसे आदित्य ठाकरेंना वरळीत आव्हान देणार?

नेत्यांमध्ये जुंपली, कार्यकर्तेही भिडले

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंनी 6 जून रोजी एक्सवर पोस्ट टाकून पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे किंवा रोहित पवारांच्या नियुक्तीची मागणी केली. त्यावर जयंत पाटलांचे निकटवर्तीय अॅड. भूषण राऊत यांनीही पोस्ट टाकून प्रदेशाध्यक्षपदावर दावा करणाऱ्यांना टोला लगावला. या अंतर्गत वादामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टीकेची आयती संधी मिळालीय.

जयंत पाटील गेल्या 6 वर्षांपासून प्रदेशाध्यक्षपदावर आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात रोष वाढल्याची चर्चा आहे. त्यांनी विधानसभेनंतर प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी शरद पवार निवडणुकीपूर्वीच खांदेपालट करणार की पाटलांवर विश्वास दाखवणार याची उत्सुकता लागलीय.

Jayant Patil Vs Rohit Pawar
Maharashtra Politics 2024 : 'जमीन कसायची सोडू नका, सरकार बदलायचंच'; शरद पवार यांचा शेतकऱ्यांशी मनमोकळा संवाद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com