मुख्यमंत्र्यांचे पूरग्रस्त भागावर लक्ष्य - जयंत पाटील

अलमट्टी धरणातून दोन लाख क्युसेक्स पाणी विसर्ग करण्यात यावे या विषयी कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकार मध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांचे पूरग्रस्त भागावर लक्ष्य - जयंत पाटील
मुख्यमंत्र्यांचे पूरग्रस्त भागावर लक्ष्य - जयंत पाटील गोपाल मोटघरे
Published On

पिंपरी-चिंचवड :  पुर परिस्थिती असलेल्या भागात एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची कुमक पाठविण्यात आली आहे. सर्व स्तरावर बचाव कार्य करण्यात येत आहे. स्वतः मुख्यमंत्री कंट्रोल रूम मध्ये बसून पुर परिस्थिती असलेल्या भागावर लक्ष्य ठेऊन आहेत. अशी माहिती राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज पिंपरी चिंचवड मध्ये दिली.

हे देखील पहा -

कोयना धरणात 24 तासात 12 टीएमसी पाणी पातळीचा उचांक आहे. मात्र गेल्या 24 तासात 18 टीएमसी उचांकाची पातळी पाण्याने गाठली आहे. त्यामुळे काल रात्री पासून कोल्हापूर, सांगली भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. असे राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

कोयना धरणातून सध्या 10 हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. तो आता 50 हजार क्युसेक्स पर्यंत वाढवण्यात येणार आहे. कोयना धरणातून विसर्ग होणारे पाणी सध्या महाराष्ट्र बॉडरवरील राजापूर धरणापर्यंत पोहचले आहे. अद्यापही पाणी कर्नाटक मधील अल्मट्टी धरणापर्यंत पोहचले नसल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांचे पूरग्रस्त भागावर लक्ष्य - जयंत पाटील
तिरुपतीला दर्शनासाठी निघालेल्या चार जणांवर काळाचा घाला !

अलमट्टी धरणातून दोन लाख क्युसेक्स पाणी विसर्ग करण्यात यावे या विषयी कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकार मध्ये चर्चा सुरू आहे. असे देखील जयंत पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री पूरग्रस्त भागात नक्की पाहणी करतील, मात्र त्या ठिकाणी सध्या बचाव कार्य सुरू असल्याने व्हीआयपी मुमेंट झाल्यास बचाव कार्यास अडथळा निर्माण होईल म्हणून मुख्यमंत्री पुरग्रस्त भागाला सध्या पाहणी करत नाहीत असे जयंत पाटील म्हणाले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com