Ujani Dam Water Level : उजनीच्या पाण्यासाठी पुण्यातील सिंचन भवनासमोर शेतक-यांचा टाहाे

साेलापूर जिल्ह्यात शेतीसह पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
farmers protests at pune irragation office for ujani dam water
farmers protests at pune irragation office for ujani dam watersaam tv
Published On

Pandharpur News : उजनी धरणातून उजवा आणि डाव्या कालव्यातून पाणी सोडावे या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी पुणे येथे सिंचन भवनासमोर आंदोलन सुरू केलें आहे. या आंदाेलनात माेठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले आहेत. (Maharashtra News)

farmers protests at pune irragation office for ujani dam water
Swabhimani Shetkari Sanghatana : अन्नत्याग आंदोलनाचा पाचवा दिवस, उपाेषणकर्ते प्रशांत डिक्कर मंडपातून गायब, प्रशासनास फुटला घाम

आॅगस्ट महिना संपला तरी अद्याप सोलापूर जिल्ह्यात पाऊस नाही. त्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी उभी पिके जळू लागली आहेत. सध्या उजनी धरणात 13 टक्के पाणीसाठा (ujani dam water level) शिल्लक आहे. येत्या काही दिवसांत पाणी सोडावे अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा प्रभाकर देशमुख यांनी दिला आहे.

farmers protests at pune irragation office for ujani dam water
Bailgada Sharyat : बैलगाडा शर्यतीवरुन नवा वादंग, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने जाहीर केला महत्त्वपूर्ण निर्णय

पाण्याअभावी शेतकरी हतबल

दरम्यान पावसाने ओढ दिल्याने पंढरपूर व परिसरात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस नसल्याने उभे जळू लागली आहेत. त्यामुळे शेतक-यांवर मोठं संकट ओढावले आहे.

हजारो रूपये पेरणीसाठी खर्च करून ही पिकं जळू लागल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील शेतकरी संभाजी चव्हाण यांनी पाण्याअभावी जळू लागले उभे मक्याचे पिकं रोटावेटरने आज नांगरून टाकले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com