Badnapur News : धक्कादायक! १२ वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं हॉस्टेलमध्येच संपवलं आयुष्य

Jalna News : जालन्याच्या बदनापूर शहरालगत असलेल्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील वस्तीगृहात इयत्ता बारावी मध्ये शिकणाऱ्या तरुणीने रात्रीच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली
Badnapur News
Badnapur NewsSaam tv
Published On

अक्षय शिंदे, साम टीव्ही 

जालना : बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. जालन्यातील बदनापूर येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनीने जीवन संपविले आहे. दरम्यान या विद्यार्थिनीने आत्महत्या नेमकी कोणत्या कारणाने केली हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. 

जालन्याच्या बदनापूर शहरालगत असलेल्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील वस्तीगृहात इयत्ता बारावी मध्ये शिकणाऱ्या तरुणीने रात्रीच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. ज्योती सुरासे असे या विद्यार्थिनीचे नाव असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. ज्योती सुरासे ही बदनापूरमधील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात शिक्षण घेत ती वसतिगृहात वास्तव्यास होती. 

Badnapur News
Shirdi Murder Case : दुहेरी हत्याकांडानंतर पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर; एजंट, अवैध व्यवसाय करणाऱ्यांची धरपकड

आठवडाभरात दुसरी घटना 

दरम्यान बदनापूर शहरातच एका उच्चशिक्षित तरुणीने दोन वर्षांपासून स्पर्धा परीक्षांची तयारी सुरु असताना उच्चशिक्षण घेऊन शासकीय नोकरी मिळत नसल्याने नैराश्यातून या तरुणीने टोकाचे पाऊल उचलले आहे. मागील ५ ते ६ दिवसांपूर्वी बदनापूर येथील एका उच्चशिक्षित तरुणीने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. हि ताजी असतानाच आज पुन्हा एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्यामुळे बदनापूर तालुक्यात खळबळ उडाली. 

Badnapur News
Water Crisis : जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराला बांधले हंड्याचे तोरण; पाण्यासाठी महिलांचा घागर मोर्चा

पोलिसांकडून तपास सुरु 

आठवडाभरात घडलेल्या दुसऱ्या घटनेने बदनापूर शहरात खळबळ उडाली आहे. ज्योती हि ही बदनापूर येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होती. दरम्यान तिने टोकाचे पाऊल कोणत्या कारणाने उचलले याचे कारण अद्याप समोर आलेले नसून पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. दरम्यान या प्रकरणी अधिकचा तपास बदनापूर पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com